बीड | वार्ताहर
गेल्या 50 वर्षात बीड जिल्ह्यातील जनतेने आणि माझ्या जीवलग कार्यकर्त्यांनी माझ्या राजकिय व सार्वजनिक प्रवासात प्रेम आणि पाठबळ दिलेले आहे. अशा जीवाभावाच्या लोकांना विश्वासात घेतलेल्याशिवाय मी कोणताही राजकिय निर्णय घेणार नाही.विकासासाठी व जनहितासाठी सतत पाठपुरावा आणि संघर्ष चालु राहील सध्या सुरु असणाऱ्या चर्चेत किंवा राजकिय निर्णयात माझा कसलाही सहभाग नाही, भविष्यात योग्य वेळी सर्वांना विश्वासात घेऊन योग्य राजकिय निर्णय घेतला जाईल.माझ्या राजकिय स्वार्थासाठी मी कुठलेही निर्णय कधीही घेतलेले नाही, जनतेचा कौल जो असेल तोच माझा निर्णय असेल अशी प्रतिक्रिया माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे.
Leave a comment