बीड | वार्ताहर
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून कायम रुग्णसेवेत दक्ष राहून काम करणार्या डॉ.नागेश चव्हाण यांच्याकडे आता अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यापदाच्या कारभारासह जिल्हा शल्यचिकित्सक पदाचाही पदभार आरोग्य उपसंचालक लातूर दिले आहे.
मागील काही दिवसापुर्वीच जिल्हा रुग्णालयामध्ये अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा पदभार घेतल्यानंतर रोज नित्यनियमाने आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी सकाळी आठ वाजल्यापासून रुग्णालयात दाखल होत रुग्णसेवेत राहून जिल्हा रुग्णालयाचा संपूर्ण राऊंड घेत रोज अनेक अवघड शस्त्रक्रिया करण्याचे काम डॉ.नागशे चव्हाण करत आहेत. त्याच्या या कर्तव्यदक्ष कार्यामुळे आरोग्य उपसंचालक यांनी रिक्त झालेल्या जिल्हा शल्यचिकित्सक पदाचाही पदभार त्यांच्याकडे दिले आहे. कर्मचार्यांसह अधिकार्यांमध्ये कायम मिळून मिसळून राहत रुग्णांना उत्तम आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून डॉ.नागेश चव्हाण यांची हातोटी चांगली आहे. यामुळे रुग्णांना आणखी चांगली आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे दिसून येते. मागील आठ दिवसांपासून कर्मचार्यांना नियमाचे बंधन घालत शिस्त लावण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. आता दोन्ही पदाचे कारभारी डॉ.नागेश चव्हाणांच असल्यामुळे सिव्हील मधील रुग्णसेवा सुपरफास्त होणार असल्याचे मत व्यक्त केले जात असून यापुर्वीही डॉ.नागेश चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालयातील याच दोन्ही पदाचा कारभार चांगल्यारिते संभाळलेला आहे. त्यामुळे ते आताही रुग्णसेवेसाठी दक्ष राहूनच काम करत असल्याचे दिसते.
Leave a comment