विहामांडवा | प्रतिनिधी
विहामांडवा टाकळी अंबड रस्त्यावरील पूल कोसळण्याच्या मार्गावर आहे परंतु तात्काळ दुरुस्ती न करता बांधकाम विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजूस दोन दिवसापूर्वी मोठ-मोठे खड्डे खणून रस्ता रहदारीसाठी पूर्णपणे बंद केल्याने आठ खेड्यातील लोकांची गैरसोय होत आहे.
विहामांडवा टाकळी अंबड रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पूल कोसळण्याच्या मार्गावर असल्याने गेल्या अनेक दिवसापासून चार चाकी वाहनांसाठी हा रस्ता बंद करण्यात आला होता.परंतु पूलाची अवस्था अधिकच बिकट झाल्याने दोन दिवसापूर्वी बांधकाम विभागातर्फे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठे मोठे खड्डे करून संपूर्ण रस्ता रहदारी साठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तेथे राहणाऱ्या सात ते आठ खेड्यातिल नागरिकांना पाच किलोमीटर विहामांडवा गाठण्यासाठी बारा किलोमीटरचा अधिक चा प्रवास करावा लागतो.तसेच पेट्रोल दरवाढी ने पैशाचा अधिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.दोन दिवसापासून रस्ता पूर्णता बंद केल्याने विहामांडवा बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तू व दवाखान्यासाठी नागरिकांचे हाल होत आहे.
सध्या श्री रेणुकादेवी शरद सहकारी कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या मुक्या प्राण्यांना जास्तीचा प्रवास करून याचा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे तात्काळ पूल दुरुस्त करून जनतेचे होणारे हाल टाळावे.अशी मागणी येथील सात ते आठ खेड्यातील नागरिकांकडून होत आहे.
Leave a comment