विनामास्क फिरणार्या तसेच सामाजिक अंतराचे पालन न करणार्यांवर कडक कारवाई करा
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे निर्देश
जालना । वार्ताहर
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज दि. 16 सप्टेंबर रोजी मंठा येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन जनतेला देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची पहाणी केली. जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, मंठा येथील कोरोनाबाधित रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणीच उपचार मिळावेत यासाठी ग्रामीण रुग्णालयात डेडीकेटेड कोव्हीड केअर सेंटर सुरु करुन या ठिकाणी 40 ऑक्सीजन बेडची व्यवस्था करण्याच्या सुचना त्यांनी उपस्थित अधिकार्यांना केल्या. या सुविधेमुळे या तालुक्यातील रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गरज पडणार नसल्याचे सांगत हे सेंटर येत्या 15 दिवसांमध्ये सुरु झाले पाहिजे. या ठिकाणी येणार्या रुग्णांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा मिळतील तसेच कोणाचीही तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही जिल्हाधिकार्यांनी यावेळी सांगितले. मंठा येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक विनामास्क तसेच सामाजिक अंतराचे पालन करत नसल्याचे निदर्शनास येत असुन पोलिस विभागाने अशा नागरिकांवर कडक कारवाई करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसिलदार सुमन मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चाटसे, तालुका कृषि अधिकारी श्री राठोड,पोलीस निरीक्षक विलास निकम आदींची उपस्थिती होती.
तहसिल कार्यालयात घेतला महसुल विभागाचा आढावा
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तहसिल कार्यालय,मंठा येथे महसुल विभागाचा सविस्तर आढावा घेतला. उपस्थित अधिकारी, कर्मचार्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला महसुल जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात येते. त्यानुसार मंठा तालुक्यात महसुलाचे उद्दिष्ट पुर्ण् होईल, याकडे सर्व संबंधितांना लक्ष द्यावे. अकृषिक कराची आकाराणी गणना करुन वसुली करण्याबरोबरच तालुक्यातील ज्याही मंडळातील महसुल वसुली प्रलंबित असेल ती 15 दिवसांमध्ये पुर्ण करण्याच्या सुचना देत कोव्हीड-19 तसेच तालुक्याच्यादृष्टीने महत्वपुर्ण अशा बैठकीस पूर्वकल्पना देऊनसुद्धा अनुपस्थित राहणार्या नायब तहसिलदारांना नोटीस बजावुन त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिले.
Leave a comment