जालना । वार्ताहर
अवैध 34 लाख 15 हजारचा गोवा गुटखा घेऊन जाणारा ट्रक गोंदी पोलिसांची आज सकाळी 8 वाजेच्या दरम्यान बीड ते औरंगाबाद रोडवरील गहिनीनाथनगरजवळ पाठलाग करून पकडला असून ड्रायव्हर व क्लीनर यांना ताब्यात घेतले आहे.
या बाबत थोडक्यात माहिती अशी कि आज दि.15 रोजी सकाळी 7 वाजता गोंदी पोलिसांना माहिती मिळताच बीडकडून औरंगाबादकडे भरधाव वेगाने जात असलेल्या या ट्रकचा क्र. के ए-56, 5413 गहिनीनाथनगरजवळ पोलिसांनी पाठलाग करून पकडला.झाडाझडती घेतली असता, या ट्रकमध्ये वरच्या बाजूला कुजलेल्या ज्वारीच्या 23 गोण्या होत्या, त्याखाली गोवा -1000 गुटख्याच्या 207 गोण्या आढळून त्याची किंमत 34 लाख 15 हजार पाचशे रुपये, व ट्रक ची किंमत 17 लाख रुपये असा 51 लाख 15 हजार पाचशे रुपयाचा मुद्दे माल जप्त केला असून ट्रकचालक हनुमान गुरव (रा. पुणे), क्लिनर अख्तर दिलावर शेख (रा.शेवगाव, जि. नगर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हि कार्यवाही पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, अंबड चे उपविभागीय पोलीस अधिकारी अभय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, पोहवा. भास्कर आहेर, नारायण माळी, नितीन खरात, गृहरक्षक दलाचे जवान गिरी यांनी केली आहे.
Leave a comment