जालना । वार्ताहर
परतूर तालुक्यातील रोहिना येथे वारकरी ङ्गाउंडेशन च्या वतीने हभप दासोपंत म.रोहीणेकर यांना किराना किट वारकरी ङ्गाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष हभप सतिश म शास्त्री जाधव यांच्या हस्ते अर्पित करण्यात आली, यावेळी हभप गणेश म जाधव,.हभप विष्णु म.आनंदे, हभप पांडुरंग म. गोळेगावकर, ह भ प गणेश म. सुरुंग, हभप अनिल म. गवळी, हभप भाऊसाहेब म. साकळगावकर. हभप रामेश्वर नरवडे, हभप बाळु म. काकडे, हभप पोटे,यांची उपस्थिती होती.
यावेळी हभप सतीश म.शास्त्री जाधव यांनी बोलतांना सांगितले की वारकरी ङ्गाउंडेशन हे गोरगरीब वारकऱया साठी सात्तत्याने काम करत आहे, तरी कोणी गोरगरीब भुमीहीन गरजु निष्टावंत वारकरी असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा असे ही विनंती पूर्वक सांगितले.
Leave a comment