भोकरदन मधून तब्बल 1 लाख 17 हजार रुपयांची मोठी मदत
भोकरदन । वार्ताहर
माणुसकीच्या भावनेतून अनेक गंभीर प्रसंगात मदतकार्य होत असते.असाच एक प्रसंग घाणखेडा ता.जाङ्गराबाद येथील आदित्य ज्ञानेश्वर रगड या पाचवीत शिकणार्या विद्यार्थ्याच्या बाबतीत काही दिवसांपुर्वी घडला.गौरी गणपतीच्या कार्यक्रमासाठी आदित्य हा आपल्या आत्याच्या घरी गेला असता शेजारच्या मित्राच्या घराच्या छतावर लोंबकळत असलेल्या मुख्य विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने त्याचा हात भाजला.त्याला बसलेल्या धक्क्याने तो नशिबाने वाचला परंतु भाजलेला हात तोडावा लागला.या सर्व उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने त्याचे वडील ज्ञानेश्वर रगड हे हताश झाले,परंतु त्याचे शिक्षक श्री.ज्ञानेश्वर झगरे गुरुजी यांनी त्याला मदत मिळवून देण्यासाठी स्वतः व मित्रमंडळींना आवाहन केले.
भोकरदन येथून कृष्णा वाघ यांनी आपल्या ङ्गेसबुक पेजवर मदतीचे आवाहन केले.ज्याला अनेकांनी उत्तम प्रतिसाद देत आपापल्या परीने मदत दिली.यामध्ये विशेषत: भोकरदन जाङ्गराबाद येथील शिक्षक,जालना जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनी यासोबतच विविध समाजसेवक व मराठवाडा व राज्यातून देखील मोठी मदत मिळाली.जमा झालेल्या 1 लाख 17 हजार 835 रुपयांचा धनादेश आर्यन इंगळे,विठ्ठल घायाळ,भास्कर कढवने, हभप.ज्ञानेश्वर झगरे गुरुजी व कृष्णा वाघ यांनी बेंबडे हॉस्पिटल,औरंगाबाद येथे वडील ज्ञानेश्वर रगड व त्याची आजी यांच्याकडे सुपूर्द केला.मदत देलेल्या सर्व मंडळींचे धन्यवाद व्यक्त करताना दोघांनाही आपले अश्रू लपविता आले नाही. या बिकट प्रसंगी ङ्गेसबुक,व्हॉटसअप च्या माध्यमातून अनेकांनी केलेली ही मदत नक्कीच प्रेरणादायी आहे.आजकाल माणुसकी हरवत चालली आहे असे वारंवार बोलले जाते मात्र आदित्यच्या उपचारासाठी केलेली ही मदत माणुसकीचे दर्शन घडवून जाते.योग्य प्रसंगी मदत देणारे अनेकजण आहेत.केवळ समाज माध्यमातून बातमी पाहून एव्हढे हात मदतीसाठी पुढे सरसावले ही गोष्ट भविष्यात नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी राहणार आहे.
Leave a comment