कोणतीही जीवितहानी नाही
तिर्थपुरी । सर्जेराव गिरे
पैठण जायकवाडी पाटबंधारे विभागातील डाव्या कालव्यावरील खापरदेव हिवरा ते एकलहरा गावासाठी व शेतात जाणारा येणारा 1972 दुष्काळी काळातील बांधलेला सिमेंट पुलाखालील कॉलम पिलर पुलाला आधार असलेले सिमेंट खांबाची काल मर्यादा संपल्यामुळे कालव्याला पाणी सोडल्यानंतर कॉलम कडून वरती सिमेंट पुल आज दिनांक 12 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पूल अचानक कालव्यात कोसळला यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही एक तर हा पूल पैठण डावा कालवा 1972 दुष्काळी परिस्थितीत कालव्याची निर्मिती झाली असताना खापरदेव हिवरा ग्रामस्थांना शेतात पलीकडे जाण्यासाठी व एकलहरा दैठणा गावांना येण्या-जाण्याचा मार्ग विचारात घेऊन पाटबंधारे विभागाने हा बांधला होता या पुलाला पंचेचाळीस ते पन्नास वर्ष उलटले असून या पुलाला अनेक दिवसापासून मोठमोठे तडे पुलावरील सिमेंट काँक्रेट निघाल्यामुळे पुलावरील लोखंडी स्टील दिसून येत होते व जागोजागी खच खळगे पडले होते, यामुळे या पुलाच्या दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभागाची दुर्लक्ष असल्यामुळे हा पूल कोसळला आहे तसेच पैठण ते किलोमीटर एक ते शेचाळीस आष्टीपर्यंत या जायकवाडी डाव्या कार्यावर अनेक रहदारी जाणारे-येणारे सिमेंट पूल बांधण्यात आले खरे पण या पुलाची डागडुजी दुरुस्ती केलीच नसल्यामुळे अनेक पूलाची परिस्थिती नाजूक झाली असून यामुळे अनेक पुलाला तडे, खळगे, काँक्रीट निघाल्यामुळे कार्यकाळ संपल्यामुळे कधीही या पुलापासून धोका निर्माण झालेला आहे.
यामुळे या पुलांची दुरुस्ती करण्यासाठी पाटबंधारे विभागांच्या अधीक्षक अभियंता शिंदे यांनी जातीने लक्ष घालून नव्याने पुलाची दुरुस्ती करावी नसता पुढील एखादी दुर्घटना झाल्यास यास पाटबंधारे विभागात जबाबदार राहणार असून आज खापर्देव्हीवरा ते एकलहरा जाणारा येणारा पूल कोसळल्यामुळे दोन्ही गावांना चार ते पाच किलोमीटर अंतरावरून भारडी पुलावरून या जावे लागणार आहे तसेच या ऊन पडल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे पैठण नाथ नगर उत्तर कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांना तात्काळ माहिती देण्यात आली तसेच पूल कोसळल्यानंतर पाटबंधारे विभागाचे अभियंता चामे सह अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली, जायकवाडी पाटबंधारे डाव्या कालव्यावरील अनेक जल शेतु दुरुस्तीची मागणी जायकवाडी डावा कालवा वरील अनेक जल सेतू पूल बांधण्यात आले असताना त्यावर अनेक पूल जल सेतू दुरावस्था झाली असून पुलाचे कठडे सिमेंट भिंती पूर्णपणे मोडकळीस आल्यामुळे जाणारे येणार्या वाहनांना कठडे नसल्यामुळे मोठे धोका झाले असून यामुळे जीव मुठीत घेऊन लोकांना जल सेतू व सर्व्हिस रोड वरून जावे लागते यामुळे या जल सेतू व पुलाची दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आघाडी सरकारने तात्काळ पाटबंधारे विभागात निधी द्यावा अशी मागणी शेतकर्यांमधून केली जात आहे, रहदारीचा सिमेंट पूल कालव्यात कोसळला मोठी जीवितहानी टळली. सध्या जायकवाडी नाथसागर भरल्यामुळे बाराशे क्युसेस पाणी डाव्या कालव्यात सोडण्यात आल्यामुळे हा सिमेंट पूल कालव्याच्या पाण्यात उसळला असून वाहणारे पाण्याचा प्रवाह अडथळे निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे, सध्या पैठण नाथ सागर 100% भरल्यामुळे त्यामधून जायकवाडी डाव्या कालव्यात दीड हजार क्यून सेस पाणी सोडण्यात आले असून हा सिमेंट पूल पाण्यात कोसळला असून यामुळे कालव्याची पाणी वाहन क्षमता मोठे अडथळे येत असल्याचे दिसून आले.
Leave a comment