कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र उक्कडगाव येथील संजय महाराज तौर यांची निवड. अखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य नितीन दादा सातपुते मराठवाडा अध्यक्ष महादेव महाराज ढवळे संपर्कप्रमुख रामकिसन महाराज पारवेकर जिल्हा अध्यक्ष शरद महाराज देवडे यांच्या प्रेरणेने सर्वानुमते अखिल विश्व वारकरी परिषदेच्या युवा घनसावंगी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली अखिल विश्व वारकरी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नितीन सातपुते यांनी ही नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.
वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करण्यासोबतच समाज प्रबोधनातून सकळ जनाचे कल्याण ही परिषदेची विचारधारा आहे या विचारधारेला अनुसरून आपल्या आजवरच्या कार्याची वाटचाल सुरु आहे आपल्या हातून हे कार्य अविरत आणखीन जोमाने होईल या विश्वासाने आपली या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आपले पुढील कार्य सिद्धीस जाईल हीच पांडुरंग चरणी प्रार्थना असे नियुक्ती पत्रकात म्हटले आहे. या निवडीचे गाव व पंचक्रोषीतील भजनी मंडळ ,महाराज मंडळी ,वारकरी साप्रदयातून अभिनंदन होत आहे.
Leave a comment