जालना । वार्ताहर
शेतात पाणी साचुन पिकाचे नुकसान होत असल्याले शेतकर्यांने नाला खोदुन पाणी बाहेर काढले दरम्यान कडुबा पैठणे यांने किसनराव वैद्य या शेतकर्यास नाला का काढला म्हणुन आश्लिल शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बदनापुर तालुक्यातील काजळा येथे घडली.
या संदर्भात माहिती अशी की किसनराव दगंडुजी वैद्य या शेतकर्यांची गट नं 319 मध्ये 0.54 आर क्षेत्र ङ्गळाची शेती आहे. गेल्या पंधरा दिवसापुर्वी पडलेल्या संततधार पाऊसा मुळे शेतीमध्ये पाणी साचले होते.त्यामुळे पिकाचे नुकसान होत असल्याने वैद्य या शेतकर्यांने शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी चर (नाला) खोदला होता, हा नाला का खोदला म्हणुन गावातील कडुबा पैठणे त्याचे मुले गौरख, मच्छिचंद्र आणि शाहादेव यांनी दिनांक 10 सप्टेंबर रोजी संदरील नाला बुजवुन टाकला. याच्या कारण विचारले असता उपरोक्त लोकांनी शिविगाळ करुन जिवेमारण्याची धमकी दिली. या प्रकणी बदनापुर पोलिस ठाण्यात पैठणे विरुध्द अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास शेळके करीत आहे.
Leave a comment