औरंगाबाद । वार्ताहर
शहरातील डी मार्ट मॉलमध्ये स्थानिक बेरोजगारांना युवकांना रोजगार देण्यात यावा, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आनंद मगरे यांच्या वतीने देण्यात आले. हडको परिसरातील डी मार्ट मॉल मध्ये परिसरातील वसाहतीत राहत असलेल्या बेरोजगार युवकांना डी मार्ट मॉल प्रशासन रोजगार देत नसल्याचा आरोप आनंद मगरे यांनी केला आहे.
मॉल प्रशासनाने स्थनिक बेरोजगार युवकांनाच रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावा नसता आंदोलनचा इशारा डी मार्ट मॉल प्रशासनास दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर आनंद नगर, गोविंद चंदनशिवे, स्वप्नील खरात, अजय हिवाळे, मंगेश काकडे, रोहित साबळे यांच्या सह्या आहेत.
Leave a comment