तिर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील येथील ते 33 के व्ही उप केंद्र महावितरण कार्यालय असून या या केंद्र अंतर्गत तीन कृषिपंपाची ङ्गिडर असून सात ते आठ गावे गावठाण ङ्गिडरवर जोडलेले असताना आज कार्यरत असलेल्या सबस्टेशन मध्ये पाच एम पी पावर ट्रांसङ्गार्मर असून या कृषी पंपाचे मोटारी सुरू झाल्यास पाच एंपियर पॉवर सप्लाय आपोआप वर लोड होत असल्यामुळे शेतकर्याची गेल्यावर्षी जायकवाडी डाव्या कालव्याला व विहिरींना तसेच गोदावरी बंधार्याला पाणी असताना वीज पुरवठा न न मिळाल्यामुळे शेतकर्यांची उभी पिके पाणी असून विजेअभावी जळून गेली होती यावर मतदार संघाचे आरोग्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडे शेतकर्यांनी दहा पावर सप्लायर ट्रांसङ्गार्मर बसविण्याची ची मागणी केली होती पण आज पर्यंत सध्याचा या भाई गव्हाण कंडारी ङ्गिडर पाऊस काळातच लोड होत आहे यामुळे 10 ऑक्टोंबरला जायकवाडी पाणी पाळी सुरू होते यावेळी कालव्यावर शेतकर्यांनी उपसा सिंचनाच्या कृषी पंपाच्या मोटारी टाकल्यास गेल्या वर्षी जी परिस्थिती शेतकर्यांची झाली तीच परिस्थिती यावर्षीही पाणी असून पिकांना देता येणार नाही यामुळे पालकमंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी भाई गव्हाण, खापरदेव, हिवरा, बाचेगाव, तीर्थपुरी, कंडारी, खालापुरी, शेवता, जोगलादेवी आदीसह गावातील शेतकर्यांमधून केली जात आहे.
तसेच यावर्षी पैठण नाथ सागर 1 वरील नाशिक एक नगर आदीसह कार्यक्षेत्रात पाऊस पडल्यामुळे नाथ सागर 100% तुडुंब भरला असून तसेच घनसावंगी तालुक्यातील गोदावरी पात्रावर जोगलादेवी मंगरूळ राजाटाकळी या उच्च पातळी बंधारे पाण्याने झाल्यामुळे कृषी पंप मोटारी पाणी उपसा मोठ्या प्रमाणात केला जाईल तसेच जायकवाडी डाव्या कालव्यावर मोठ्या प्रमाणात उपसा सिंचनाच्या मोटारी टाकल्या जाणार आहे यामुळे तीर्थपुरी येथील महावितरण उपकेंद्रांमध्ये 10 एम पी पॉवर सप्लाय ट्रांसङ्गार्मर तात्काळ बसविण्याची मागणी केली जात असून यामुळे गायगव्हाण ङ्गिडरवर बालाजी एक्सप्रेस कंडारी ङ्गिटर जोगलादेवी शेवता आदीसह कृषी पंपा सुरू केल्यास तीर्थपुरी येथील पावर सप्लाय वेळोवेळी ओवरलोड होतो महावितरणने गेल्या वर्षी उन्हाळ्यात शेतकर्यांना एक दिवसा आड वीज पुरवठा तो पण कमी दाबाने दिला होता यामुळे कालव्याला बंधार्याला विहिरीला पाणी असून देता आले नाही यामुळे शेतकर्याची एकच ओरड राजेश टोपे यांच्या बैठकीत व तक्रारी केल्या होत्या याला वर्ष उलटले तरी 10 एम पी पावर ट्रांसङ्गार्मर अजून पर्यंत बसविण्यात आला नाही तरी राजेश टोपे यांनी महावितरण मुख्य अभियंता औरंगाबाद अधीक्षक अभियंता जालना यांना तात्काळ पावर सप्लाय बसवण्यासाठी आदेश द्यावे अशी मागणी शेतकर्यांमधून केली जात असून तसेच पावर सप्लाय ट्रांसङ्गार्मर बसविल्यास ऑक्टोंबरमध्ये पाणी पाळी कालव्याला पाणी सोडल्यास शेतकरी कृषी पंप न चालल्यास रस्ता रोको आंदोलन महावितरण कार्यालयावर करण्याचा इशारा शेतकर्यांमधून केला जात आहे. आमच्या प्रतिनिधीने महावितरणच्या घनसावंगी येथील उपअभियंता यांच्याशी संपर्क साधला असता तीर्थपुरी उपकेंद्रात पाच एंपियर पावर ट्रांसङ्गार्मर होत असल्यामुळे याची दखल पालकमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून या या दहा एंपियर ट्रांसङ्गार्मर बसविण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करून चार ते पाच महिने पूर्वी केली आहे वरिष्ठ महावितरणच्या अधिकार्याकडून मंजुरी मिळताच ट्रांसङ्गार्मर बसून शेतकर्यांची अडचण दूर केली जाईल असे अभियंत्यांनी ङ्गोनवर सांगितले.
Leave a comment