अवघ्या तीन तासात धरणाचा जलसाठा ९८.२५% झाला

शनिवारी धरणाच्या दरवाजा क्र १०, २७, १८, १९ या   चार दरवाजातून विसर्ग करण्यात आला

रविवारी रात्री १० ते ११ या दरम्यान १६, २१, १४,  २३, १२, २५, ११, व २६ हे दरवाजे अर्धा फुटाने उघडले

पैठण | वार्ताहर

जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात आज दुपारनंतर अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली . झालेल्या पावसाचे पाणी गतीने नाथसागरात दाखल होत

असल्याने तातडीने रात्री १० वाजेच्या दरम्यान धरणाचे आणखी आठ दरवाजे अर्धाफुटाने वर उचलून गोदावरीत विसर्ग वाढविण्यात आला . यामुळे आता धरणाच्या १२ दरवाजातून गोदावरी पात्रात ६२८८ असा विसर्ग होत आहे . जायकवाडी धरणाचा जलसाठा सायंकाळी सहा वाजता ९ ८ % होता . दरम्यान जायकवाडी धरण व बँकवाटर परिसरात आज अनेक ठिकाणी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हे पाणी सरळ नाथसागरात दाखल होण्यास प्रारंभ झाला यामुळे अवघ्या तीन तासात धरणाचा जलसाठा ९ ८.२५ % झाला . गतीने धरणाच्या जलाशयात पाणी दाखल होत असल्याने जायकवाडीचे धरण अभियंता संदिप राठोड यांनी या बाबत वरिष्ठांना कल्पना दिली . जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी तातडीने धरणाचे आणखी आठ दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून धरणातून विसर्ग करण्याचे आदेश दिले . शनिवारी धरणाच्या दरवाजा क्र १० , २७ , १८ , १ ९ या चार दरवाजातून विसर्ग करण्यात आला होता तर रविवारी रात्री १० ते ११ या दरम्यान १६ , २१,१४ , २३,१२,२५,११ , व २६
हे दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून प्रत्येक दरवाजातून ५२४ क्युसेक्स असा विसर्ग वाढविण्यात आला . यामुळे धरणाच्या १२ दरवाजातून ६२८८ क्युसेक्स व जलविद्युत केंद्रातून १५ ९ ० क्युसेक्स असा एकूण ७८७७ क्युसेक्स विसर्ग गोदावरी पात्रात होत आहे . याशिवाय धरणाच्या उजव्या कालव्यातून ६०० व डाव्या कालव्यातून ३०० क्युसेक्स क्षमतेने विसर्ग शुक्रवार पासून सुरू आहे . धरणात सायंकाळी ७३६७ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती . धरणात जेवढी आवक सुरू होती त्यापेक्षा थोड्याफार प्रमाणात विसर्ग वाढविण्यात आला असे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले . दरम्यान आज नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग थोडे वाढविण्यात आले आहेत . जायकवाडी धरणातून नियंत्रित विसर्ग करण्यात येईल असे स्पष्टपणे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले .

धरण व तालुका प्रशासन झाले सतर्क

दरम्यान, अचानक मोठा पाऊस झाल्यामुळे  जायकवाडी धरणात पाणी  येण्यास सुरुवात झाली. यामुळे धरण व तालुका प्रशासनाने सतर्क होवुन पाणी पातळीची विशेष नौंद घेवुन तातडीने गोदापात्रात पाणी सोडले. पाणी वाढत असल्यामुळे जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, उप अभियंता , सहायक अभियंता यांनी धरणावर ठाण मांडून विशेष नियंत्रण ठेवले आहे. तालुका प्रशासनात तर्फे तहसीलदार  यांनी गोदाकाठच्या गावांना सोशल मिडिया व महसुल यंत्रणेच्या माध्यमातून संपर्क साधुन सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.