शेतकर्यांचा प्रतिनिधी म्हणून माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी मानले केंद्र सरकारचे आभार
जालना । वार्ताहर
भारत हा कृषिप्रधान देश असून मोठ्या शेतकर्यांप्रमाणे लहान शेतकरीदेखील सक्षम झाला पाहिजे या केंद्र शासनाच्या धोरणामुळे शेतकर्यांना माफक दरात कर्ज मिळण्याची सुविधा तर उपलब्ध होईल त्याचबरोबर पीक काढणीनंतर शेतकर्यांचे होणारे प्रचंड नुकसान केंद्र सरकारच्या मदतीने आता टाळता येणार आहे त्यासाठी केंद्र सरकारने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी कृषी क्षेत्रामध्ये एक लाख कोटी रुपयांचा निधी उभारणार असल्याची माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी दिली आहे लहान शेतकर्यांना सक्षम करण्याचे केंद्र सरकारचे धोरण खरोखरच अत्यंत प्रशंसनीय असून शेतकर्यांचा प्रतिनिधी म्हणून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधांमध्ये कृषी पतसंस्था शेतकरी समित्या कृषी उद्योजक इत्यादी संस्थांच्या माध्यमातून एक लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले जाणार असून त्यामध्ये पीक काढणीनंतर शेतकर्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शीत साठवण उपग्रह विविध प्रक्रिया केंद्र अन्नधान्य भांडार सुविधा वातानुकूलित भांडार गृह यासह अनेक सुविधा शेतकर्यांना देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे पीक काढणीनंतर शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होतं ही बाब लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पेरणी उत्पादन कापणी साठवणूक वाहतूक विक्री व्यवस्था या कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला ही बाब अत्यंत प्रशंसनीय असून स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर पहिल्यांदा याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने विचार केला आहे यासाठी शेतकर्यांचा प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत असे देखील लोणीकर यावेळी म्हणाले. पी एम किसान योजनेअंतर्गत वर्षाकाठी सहा हजार रुपये शेतकर्यांना देण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून या देशात सुरू झाली व सहा टप्प्यात ही योजना पूर्णत्वास देखील आली आहे बलराम जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एक लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत निधीची घोषणा केली त्याच वेळी सहाव्या टप्प्यातील पी एम किसान योजनेचे 17000 कोटी रुपयाचे वाटप देखील पंतप्रधानांनी केले आतापर्यंत नऊ कोटी 90 लाख शेतकर्यांपर्यंत 75 हजार कोटी रुपये या योजनेमार्फत पोहोचले होते त्यात या सहाव्या टप्प्यातील रकमेची भर पडून हा कोटी शेतकर्यांपर्यंत या योजनेमार्फत 92 हजार कोटी रुपये पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने शेतकर्यांना दिले आहेत असेही लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारणीनंतर शेतमाल फळभाज्या भाजीपाला यासह शेतकर्याच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होणार आहे देशातील अनेक मोठ्या शहरांना जोडून किसान रेल च्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना त्यांचा माल थेट बाजारपेठेपर्यंत घेऊन जाता येणार आहे *तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी या किसान रेल साठी पंतप्रधान मोदींकडे पाठपुरावा केला होता* त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं असून किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतमालाला थेट बाजारपेठेपर्यंत उपलब्ध होणार आहे यातून शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी व शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी निश्चितपणे मदत होईल अशी अपेक्षा लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केली. कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी पी एम किसान योजना अंतर्गत वर्षाकाठी सहा हजार रुपये याप्रमाणे सहाव्या टप्प्यात आठ कोटी पन्नास लाख शेतकर्यांच्या खात्यात थेट 17 हजार कोटी रुपयांचा निधी आणि शेतमालाला चांगला भाव मिळावा व शेतकर्यांचा माल थेट बाजारपेठेपर्यंत जावा यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली किसान रेल याबाबत लोणीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासह संपूर्ण मंत्री मंडळाचे आभार मानले आहेत
Leave a comment