जालना । वार्ताहर
जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस, ज्येष्ठ पत्रकार विनायकराव दहातोंडे यांच्या पत्नी सौ. वैजयंती दहातोंडे यांचे शनिवारी (दि. 1) दुपारी 3.40 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय 58 वर्षे होते. गेल्या आठवड्यात त्यांना येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचे आज आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती विनायकराव दहातोंडे, तीन मुले अनिल, प्रदीप आणि जीवन यांच्यासह सुना, नातवंडे असा परिवार आहे. अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या असलेल्या सौ. वैजयंतीताई यांच्या अकस्मात निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Leave a comment