बदनापूर । वार्ताहर
येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक राधाकिसन हरकळ यांची हवालदारपदी पदोन्न्ती झाल्यामुळे नुकताच त्यांचा बदनापूर पोलिस ठाण्यात सत्कार करण्यात आला.
बदनापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक राधाकिसन हरकळ यांना सेवा ज्येष्ठतेमुळे पदोन्नती जिल्हा पोलिस अधीक्षक एस.चैतन्य यांनी जिल्हाभरातील विविध पोलिस ठाण्यातील 35 पोलिस नाईक यांना पोलिस हवालदारपदी पदोन्नती केलेली होती. त्या पदोन्नतीमध्ये बदनापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले हरकळ यांनाही पोलिस हवालदार म्हणून पदोन्नती मिळाली. त्या बद्दल बदनापूर पोलिस ठाण्यात त्यांचा सत्कार पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, सह पोलिस निरीक्षक भिमाळे, उबाळे, चरनसिंग बमनावत, निवृत्ती शेळके, अनिल चव्हाण, मनोज निकम आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.
Leave a comment