जालना । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील मूर्ती येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयाचा, एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल 95.45% लागला असून एकूण 66 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्या पैकी 63 विद्यार्थी ऊतीर्ण झाले. यामध्ये विशेष प्राविण्या सह प्रथम श्रेणीत, द्वितीय श्रेणीत, तर तृतीय श्रेणीत विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.
या मध्ये, सर्व प्रथम कु. सोळंके आरती वसंतराव (89.40%) सर्वद्वीतीय शेख शहजाद शौकत (86.80%) व कोरडे कृष्णा नामदेव (86.80%)तर सर्व तृतीय कु.सोळंके अंकिता बळीराम (86.20%) या सर्व ऊतीर्ण व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रवींद्रजी तौर, संस्थेच्या सचिव सौ. किरणताई तौर, संस्थेचे उपाध्यक्ष धिरजसिंह तौर, संस्थेचे संचालक डॉ. सूरजसिंह तौर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी विनोद कर्हाडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानदेव सोळंके, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Leave a comment