राज्यसरकार म्हणजे दोन चालक एक गाडी - ना.रावसाहेब पाटील दानवे
जालना । वार्ताहर
जालना शहरात व जिल्हयात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अपयशी ठरले असून आरोग्यमंत्रयांच्या जिल्हयातच आरोग्य विभागाकडून कोरोना रुग्णाचे चुकीचे कमी प्रमाणाचे आकडे दाखवून दिशाभुल केली जात असून महाराष्ट्रातील राज्यसरकार म्हणजे दोन चालक एक गाडी असा प्रकार असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी पत्रकार परिषद मध्ये व्यक्त केले.
यावेळी बोलतांना ना.दानवे म्हणाले की, केंद्राने महाराष्ट्र राज्याला 1 लाख 70 हजार रुपयाचे पॅकेज तसेच 20 कोटीचे पॅकेज अन्नधान्याचा पुरवठा शेतकर्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा अशा प्रकारे मोठया प्रमाणात केंद्राने महाराष्ट्र राज्यसरकारला मदत केली. परंतु कोरोना सारखा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यसरकार अपयशी ठरले असून 12 जुलै 2020 रोजी जालण्यात टेस्टींग लॅबचे उदघाटन झाले व सदर टेस्टींग लॅबची दररोजची तपासणी मर्यादा एक हजार आहे. परंतु दररोज फक्त दिडशे ते दोनशे व्यक्तींनाच टेस्टींग केले जाते व कोरोनाचा खरा अकडा जिल्हा प्रशासनाकडून लपविण्याचा प्रकार होत आहे. 18 तारखेला रुग्णाचा स्वँब घेतला जातो 26 ला त्याचा रिपोट येतो परंतु मध्यल्या काळामध्ये सदर रुग्णाच्या हातावर होम कॉरंटाईनचे शिक्के सुध्दा मारले जात नाही. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना चे राज्यसरकार म्हणजे दोन चालक एक गाडी असा प्रकार असून राज्यातील सरकारचा खरा कॅप्टन कोण आहे हे जनतेला माहीत असून शरद पवार हेच खरे राज्यसरकारचे कॅप्टन आहे. मुख्यमंत्री पंढरपुरला पुजेसाठी ई पुजा करण्याऐवजी स्व:त जातात व दुसर्याला ई पुजा उदघाटन करण्याचा सल्ला देतात हे मुख्यमंत्रयाचे चुकीचे आहे. जालना शहरात कोरोना तपासणीची लॅब असल्यामुळे तपासणीला गती देण्यात यावी कारण शहरामध्ये जर आरोग्य विभागाने प्रत्येक घरात व वार्डात तपासणी केल्यास जालना शहरात आजही सहा ते सात हजार कोरोना रुग्ण निघण्याची दाट शक्यता आहे. परंतु आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन अपयश लपविण्यासाठी कोरोनाची संख्या व तपासणी कमी प्रमाणात करुन दिशाभुल करीत आहे. कोरोना रुग्णाचा स्वॅब घेतल्यानंतर जर आठ दिवसानंतर त्यांचा रिपोट आला व तो जर पॉझीटीव आला तर तो मधल्या काळामध्ये कोणत्या ठिकाणी फिरला यामुळे रुग्ण वाढण्याची दाट शक्यता असते. सध्या आज रोजी जालण्यामध्ये चाळीस तज्ञ डॉक्टर असतांना व पाच हॉस्पीटल महात्मा जोतीबा फुले या योजनेत येत असतांना पंधरा तारखेला पेंशट येतो अठरा तारेखेला त्यांचा स्वॅब घेतला जातो व पंचवीसला त्यांचा रिपोट येतो यामुळे जिल्हा प्रशासनाचे कोरोना संदर्भात काय कार्यवाही चालली आहे. याबाबत जिल्हा प्रशासन कळू देत नाही कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाने चार विभागावर जबाबदार अधिकारी नेमणुक करावी दुधवाला, भाजीपाला दुकानदार यांची तपासणी नियमीत करण्यात येवून प्रत्येक नागरीकांच्या तोंडाला मास्क नियमीत व कोरोना टेस्टींगची गती वाढवून चौवीस तासाच्या आत रिपोट देवून संपर्कात आलेल्या नागरीकाला तात्काळ कॉरंटयाल करण्यात यावे त्याशिवाय परिस्थीती आटोक्यात येणार नाही असे सांगीतले यावेळी जिल्हा सरचिटणीस बद्री पठाडे, माजी शहराध्यक्ष सिध्दीविनायक मुळे, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख बाबासाहेब कोलते आदीची उपस्थीती होती.
Leave a comment