जालना । वार्ताहर

शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नावर सनदशीर लोकशाही मार्गाने मा.जिल्हाधिकारी  यांची पूर्वपरवानगी घेऊन व सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे काटेकोर पालन करत राज्याचे माजी  मंत्री तथा विद्यमान आमदार श्री बबनराव लोणीकर हे  मा. जिल्हाधिकार्‍यास निवेदन देण्यास गेले असता परभणी जिल्हा प्रशासनाने सूड बुद्धीने म्हणा किंवा प्रशासनाच्या हिताला बाधा पोहचत असल्याने गुन्हा दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. असा आरोप करत गुन्हा तात्काळ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच सोशल डिस्टंशिंगचे पालन करत  जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा घनसावंगी भाजपा तालुका उपाध्यक्ष श्यामसुंदर शिंदे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. 

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बेकायदेशीररित्या जमाव जमवून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी पाणी पुरवठा मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे आ.बबनराव लोणीकर यांच्या विरोधात नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आ.लोणीकर यांनी माजी आ.विजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, गणेशराव रोकडे, बालाप्रसाद मुंदडा, बाळासाहेब भालेराव आदींसह जिल्हाधिकारी मुगळीकर यांना निवेदन सादर केले होते. त्याद्वारे शेतकर्‍यांना बोगस बियाणे पुरवठा करणार्‍या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा, शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटप करा,  वारंवार संचारबंदी लागू करू नका, व्यवहार सुरळीत सुरू होवू द्या, अशी मागणी 14 जुलै रोजी केली होती. या अनुषंगाने छायाचित्रे प्रसिध्द झाल्यानंतर नवा मोंढा पोलिसांनी त्या गोष्टीची दखल घेऊन गुन्हा दाखल केला.लोणीकर  यांच्याविरुद्ध द्वेषाने गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई तात्काळ मागे घ्यावी, माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करणार्‍या पोलीस निरीक्षकाने जर जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय गुन्हा दाखल केला असेल तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी संबंधित पोलिस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करावे तसेच पाथरी येथील  शेतकरी विष्णू शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणार्‍या पाथरी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच सोशल डिस्टंशिंगचे पालन करत  जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा घनसावंगी भाजपा तालुका उपाध्यक्ष श्यामसुंदर शिंदे यांनी लेखी निवेदनाद्वारे जालना व परभणी जिल्हा प्रशासनास दिला आहे.  

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर हे मोजक्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकार्‍यांची परवानगी घेऊन सोशल डिस्टंसिंग चे पालन करत जिल्हाधिकार्‍यांना शेतकर्‍यांच्या मुद्द्यावर भेटण्यासाठी गेले होते त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील 13 हजारापेक्षा अधिक शेतकर्‍यांच्या सोयाबीन बियाणे उगवले नाही त्यामुळे हायकोर्टाने आदेशित केल्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारचे बियाणे महामंडळ व खासगी बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी लोणीकर यांनी केली होती जिल्हाधिकार्‍यांनी बँकांची बैठक घेऊन तात्काळ कर्ज वाटप करण्याबाबत सूचना करायला हवी अशी मागणी देखील या भेटीमध्ये लोणीकर यांनी केली होती परभणी जिल्ह्यामध्ये बँक कर्ज वाटप करत नाहीत आणि ज्या ठिकाणी केला आहे त्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे अशा प्रकारच्या तक्रारी लोणीकर आंकडे शेतकर्‍यांनी दिल्या होत्या त्यानुसार लोणीकर यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली होती परभणी जिल्ह्यामध्ये लॉकडाउन  च्या नावाखाली जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासन यांचा मनमानी कारभार सुरू होता त्यामुळे ल्हिाधिकार्‍यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारने लॉकडाऊन बाबत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे व ज्या ठिकाणी कोरोना ग्रस्त रुग्ण आढळला आहे त्या भागाला कंटेनमेंट झोन बनवावे संपूर्ण जिल्ह्याला त्यासाठी वेठीस धरू नये अशी सूचना लोकप्रतिनिधी म्हणून लोणीकर यांनी निवेदनाद्वारे  केली होती

बोगस सोयाबीन प्रकरणी लोणीकर यांनी पुढाकार घेऊन बियाणे महामंडळाचे अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करा त्याचप्रमाणे खासगी बियाणे कंपन्यांवर देखील गुन्हे दाखल करा अशी मागणी केली होती परभणी जिल्ह्यातील मर्डसगाव तालुका पाथरी येथील शेतकरी विष्णू शिंदे यांनी बोगस सोयाबीन बियाणे मुळे आत्महत्या केली होती त्या प्रकरणात देखील पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी लोणीकर यांनी केली होती शेतकर्‍यांची बाजू घेतल्याने पोलिसांनी हा सूर्य उगवला असून सोयाबीन बियाणे कंपन्यांचा मुद्दा उचलून धरल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांसह पोलिस प्रशासनाचे काहीतरी नुकसान झाले असावे म्हणून की काय लोणीकरांसह जनतेच्या सुचना घेऊन जाणार्‍या शिवसेनेचे आमदार राहुल पाटील खासदार बंडू जाधव व त्यांचे सहकारी या सर्वांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे झालेल्या कार्यक्रमात पाच हजारपेक्षा अधिक लोक उपस्थित होते त्या ठिकाणी असणार्‍या सर्व अधिकारी कर्मचार्‍यांवर गुन्हे क दाखल करण्यात आले नाहीत? असा सवाल देखील केला आहे. परभणी येथे पालकमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीमध्ये शंभरपेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते स्वतः पालकमंत्र्यांनी देखील मास्क लावलेला नव्हता त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंग घेतली मग त्यांच्यावर देखील सोशल डिस्टंसिंग च्या नियमा अंतर्गत गुन्हा दाखल करायला हवा होता त्या ठिकाणी उपस्थित असणार्‍या जिल्हाधिकार्‍यांसह तर अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करायला हवा होता परंतु जिल्हाधिकारी याठिकाणी सापत्न वागणूक देत असून गुन्हे दाखल करून प्रशासनामार्फत विरोधकांचा आवाज दाबविण्याचा हा सरकारचा कुटील डाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.