बदनापूर । वार्ताहर

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील कोविड योद्धांचा माजी आमदार संतोष सांबरे यांच्यावतीने गौरव करण्यात आला. पंचायत समिती सभागृह, येथे तालुका शिवसेनेच्या वतीने कोरोना योद्धाचा गौरव करण्यात आला.  या प्रसंगी कोरोनापासून तालुका सुरक्षित ठेवण्यासाठी दिवस रात्र कार्य करणार्‍या आरोग्य विभाग, महसूल, पोलीस प्रशासन, पत्रकार, नगर पंचायत, स्वच्छता विभाग, विद्युत वितरण कंपनी,  पंचायत समिती व इतर विभागातील कोविड योद्धांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुछ व प्रमाणपत्र देऊन माजी आमदार संतोष सांबरे यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमात गटविकास अधिकारी विठ्ठल हरकळ, पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ सोळंके, डॉ बोंडले, डॉ सरोदे, पोलीस उपनिरीक्षक व्ही व्ही पाटील, एस एम भिमाळे, नायब तहसीलदार संजय शिंदे, डॉ उज्ज्वला चव्हाण, डॉ शामल गरड, डॉ सचिन कुंभार, डॉ. कुंडकर, डॉ कासट, किशोर शिरसाठ, संदीप पवार, शाम जर्‍हाड यांच्यासह कोरोना विषाणूचा मुकाबला करणार्‍या संबधीत विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना मानपत्र व शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.या वेळी माजी आमदार संतोष सांबरे, भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, कैलास चव्हाण, गणेश डोळस, बी टी शिंदे, राजेश जर्‍हाड, रवी बोचरे, नंदकिशोर दाभाडे, नामदेव खंडेकर, पद्माकर पडुळ, राजेंद्र जर्‍हाड, श्रीराम कान्हेरे, अरुण  डोळसे, भरत मदन, शिवाजी मदन, बळीराम मोरे, गोरख लांबे, सिताराम गोरे, कैलास खैरे, परमेश्वर मात्रे, महादू गीते, संभाजी अवघड, बाळू कातुरे, बळीराम कोल्हे, संतोष नागवे, गजानन दाभाडे, अनिल हिवराळे, सुभाष आरसुळ, शिवाजी कोल्हे व शिवसेनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.