परतूर । वार्ताहर

गेल्या काही दिवसात परतूर शहरात 6 कोरोना रुग्ण आढळल्याने परतूरचा शनिवारी आठवडी बाजार प्रशासनाने  बंद ठेवला होता, तरीही भाजीपाला व ङ्गळ विक्रेत्यांनी मुख्य रस्त्यावर विक्री सुरू केली होती. पोलीस व नगरपालिका प्रशासनाला शेवटी बळाचा वापर करून बाजार भरवण्याचा प्रयत्न हाणून पाडावा लागला. परतुर शहरात गेल्या तीन चार दिवसात 6 कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने शासकीय यंत्रणा सतर्क झालेल्या होत्या, शनिवारी परतूर शहरात भरणारा आठवडी बाजार प्रशासनाने बंद केला असताना अनेक भाजीपाला व ङ्गळ विक्रेत्यांनी  मोंढा भागात बाजार जागेवर विक्रीसाठी गर्दी केली होती.

पोलीसानी आवाहन केल्यानंतर ही विक्रेते ऐकायला तयार नव्हते शेवटी पोलीस व नगरपालिका प्रशासनाने कडक भूमिका घेत बळाचा वापर करत विक्रेत्यांना मार्केट यार्डातून हाकलून दिले. त्यानंतर या विक्रेत्या पैकी अनेकांनी सातोनकर चौक, जयभवानी चौक परिसरात मुख्य रस्त्यावर विक्री सुरू केल्याने त्या ठिकाणी गर्दी वाढली व रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. पोलीस व नगरपालिका प्रशासनाने  मिळून दुपारी परत मुख्य रस्त्यावर ची भाजीपाला व ङ्गळ विक्री बळाचा वापर करत बंद पाडली व त्यांना तेथून हुसकून लावले. या अचानक रस्त्यावर भरलेल्या बाजाराने सातोनकर चौक व जयभवानी कॉलनीतील रहिवाशी व व्यापारी वर्गांला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. शेवटी पोलीस आक्रमक झाल्याचे लक्षात येताच सर्व विक्रेते पसार झाले. सध्या शहरात कोरोना चा प्रसार वेग धरत आहे,त्यामुळे पोलीस व इतर प्रशासकीय यंत्रणा गाङ्गील राहिल्या तर शहरात कोरोना प्रसार वेगाने पसरण्याची  भीती नागरिकांत आहे,या भीतीपोटी शहरातील काही नागरिकांनी अधिकारी वर्गाला निवेदन देत कडक पावले उचलण्याची मागणी केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.