कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसांगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे मीनाक्षी जिनिंग वर माजलगाव येथील मराठवाडा ट्रन्सपोर्ट चर्या बिलटी नुसार ता.24 शुक्रवार रोजी मालेगाव येथुल ट्रक क्र.(एम.एच.04-सीयु.1692) भरण्यासाठी रात्री नऊ वाजता आली होती. सकाळी 11 वाजता 10 टायर 16 टन पेंड गाडी लोड करून ट्रक ड्रायव्हर दोघेही ड्रायव्हर होते.
गाडी चालवत होते सय्यद रियाज सय्यद लियाकत चाळीसगाव ह मुक्काम मालेगाव व किंन्नर साईडला असलेले मालेगावचे ट्रक ड्रावर शेख आरेङ्ग शेख समद दोघे गाडी घेऊन अंबड पाथरी रोड वर नाष्टा करण्यासाठी आले असताना गाडी साईडला लावताना व वरतून किन्नर साईडला लोंबकळलेल्या तारांचा स्पर्श झाल्याने किन्नर ला विजेचा धक्का लागून ते खाली पडले तात्काळ पादचार्यांनी पोलिसांना झालेली घटना कळवली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्या खाली पडलेल्या व्याक्तीला सरकारी दवाखान्यात नेण्यात आले डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले पोलिसांनी नातेवाईकांना व ट्रक मालक व ट्रान्सपोर्ट मालकाला झालेल्या घटनेची माहिती दिली व पुढील कारवाई करीत आहेत.
Leave a comment