जालना । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील शंकरराव पाटील तौर प्राथमिक शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे अध्यक्ष रविंद्र (तात्या) तौर हे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रशासकीय अधिकारी विनोद कर्हाडे व शाळेचे मुख्याध्यापक प्रदिप चव्हाण हे उपस्थित होते.सर्व प्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर शालेय परिसरात विविध रोपांचे वृक्षारोपण केले.
शाळेतील शिक्षक मोहन अवचार, विष्णू शिंदे, निळकंठ खिस्ते, भगवान साबळे व सहदेव वाघमारे यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. शेवटी अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिपक सांगळे यांनी केले तर आभार विजयकुमार काळे यांनी मानले.
Leave a comment