जालना । वार्ताहर
राम मंदीर बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार केलेले चुकीच्या वक्तव्या बद्दल जालना शहरातून आज दि.24 रोजी सकाळी 11 वाजता जय श्री राम लिहलेली दोन हजार पाचशे पत्र माजी मंत्री तथा आमदार.बबनराव लोणीकर यांच्या आदेशानुसार व भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राहूल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रा.सुजित जोगस याच्या सहकार्याने पाठविण्यात आले आहेत यावेळी जेष्ठ भाजपा नेते जवाहर तुल्ले, नारायण पवार, पंकज कुलकर्णी, पुष्कर कदम, मधुसुदन दंडारे, रमेश गायकवाड, सुशील ढोले, सचिन गाडे ,राहूल पळसपगार, विनोद दळवी पाटील, करण निकाळजे, अमोल खडके , सागर आर्य, जितु मुटकुळे, रवि दांडगे,व समस्त भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a comment