कुंभारपिंपळगांव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड येथील नरोळा नदीत अज्ञानात मातेने पुरुष जातीचे नवजात अर्भक साडीच्या पदराने गळा आवळून पाण्यात ङ्गेकून दिले ता. 24 शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता येथील नदीत पिंपरखेड खडका या रोडवरील पुलाखाली एक पुरुष जातीचे अर्भक गावातील नागरिकांच्या निदर्शनास आले त्यांनी तरंगत असलेल्या अर्भकाची येथील उपसरपंच विष्णू भाऊ रक्ताटे यांना या बाबत माहिती दिली त्यांनी पोलीस पाटील यांना तात्काळ माहिती कळवली पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून घनसावंगी पोलिस ठाण्याचे ए पी आय शिवाजी बंडेवाड यांना देण्यात आली.
पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून ते अर्भक पाण्यातून बाहेर काढून कुंभार पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले येथील डॉ.एस.बी. ढवळे यांनी त्या अर्भकाची उत्तरीय तपासणी करून पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिस प्रशासन व गावातील पोलीस पाटील उपसरपंच गावातील नागरिकांच्या मदतीने पिंपरखेड येथील स्मशानभूमीत त्या नवजात अर्भकाचा दङ्गनविधी करण्यात आला या घटनेचा अज्ञात व्यक्तीच्या नावे गुन्हा दाखल करून पुढील तपास शिवाजी बंटेवाड यांच्या मार्ग दर्शना खाली करण्यात येत आहे असे सांगितले.
Leave a comment