परतूर । वार्ताहर
तालुक्यात आतापर्यंत सरासरी च्या 50% पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी असून विहीर, बोअर च्या पाणी पटलीतही मोठी वाढ झाल्याने पुढील रब्बी पिकाची श्वास्वती निश्चित झालेली आहे तालुक्याची एकूण सरासरी ही 718मिमी आहे,आतापर्यंत 358 मिमी पाऊस पडला. त्यामुळे सरासरी च्या 50% पाऊस झाल्याने शेतकरी आनंदी झालेला आहे.गतवर्षी या वेळेपर्यंत केवळ सरासरीच्या 17% पाऊस पडला होता. तालुक्यातील परतूर मंडळात गुरुवारी रात्री 65 मिली विक्रमी अतिवृष्टी ची नोंद झाली. दुसरीकडे तालुक्यातील निम्न दुधना धरणाची पाणीपातळी ही झपाट्याने वाढत आहे. मृत साठ्यात गेलेले हे धरण कालपर्यंत सुमारे 3 मीटर ने पाणीसाठा वाढला आहे. पावसाळ्या पूर्वी 31 रोजी धरणाची पातळी 419.500 मीटर होती आज शुक्रवारी ही पातळी 422.600 मीटर झालेली आहे.धरणाचा जिवंत पाणीसाठा 63.664 दलघमी झालेला आहे म्हणजेच सध्या जिवंत पाणी टक्केवारी 26.29 % झालेली आहे.गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणात पाण्याचा ओघ वाढलेला आहे.3034.801 क्यूसेस ने पाणी धरणात येत आहे.
Leave a comment