जालना । वार्ताहर

सेलू तालुक्यात तहसिलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य विभाग, सामाजिक वनीकरण यांच्या समन्वयातून घनवन वृक्ष लागवडीचे होत असलेले कार्य एकमेकांच्या चांगल्या समन्वयातून होत असल्याने ते समाधानकारक होत आहे, असे मत अप्पर विभागीय आयुक्त   डॉ. विजयकुमार ङ्गड यांनी व्यक्त केले. कोरोना विषाणूचा प्रारदुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने परभणी जिल्हयात चालू असलेल्या कामाची भेट देऊन पाहणी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातर्ङ्गे  अप्पर विभागीय आयुक्त   डॉ. विजयकुमार ङ्गड, शिवानंद टाकसाळे, उपायुक्त पांडूरंग कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, आरोग्य उपसंचालक डॉ. लाळे हे परभणी दौर्‍यावर आले असता त्यांनी सेलू येथे भेट देऊन कोरोना विषाणू कामकाजाची माहिती घेतली. सदरच्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर सेलू तालुक्यातील वृक्ष लागवडीचा आढावा घेतला. सदर आढावा घेतांना त्यांनी प्रत्यक्ष घनवन वृक्ष लागवड स्थळांना भेटी दिल्या. तहसिलदार बालाजी शेवाळे यांच्या पुढाकारातून व गट विकास अधिकारी, वैदयकीय अधिकारी, मुख्याध्यापक यांच्या समन्वयातून घनवन प्रकल्प कशाप्रकारे राबवला जात आहे, याची पहाणी केली.  

यावेळी उपस्थितांशी त्यांनी वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन या विषयावर सविस्तर चर्चा केली. वृक्ष लागवड ही काळाचीही गरज आहे. त्यामुळे सर्वांनी वृक्ष लावावेत व त्याचे संगोपन करावे. जीवनात कोणतीही गोष्ट, कोणतेही कार्य हे श्रध्दा व भावपूर्ण व्हायला हवे. श्रध्दा व भावपूर्णता हा यशाचा, आनंदाचा आधारस्तंभ होय. हा आधारस्तंभ मजबूत करणे हे ज्याच्या त्याच्या हातात असते. आपण ठरविल्याशिवाय व केल्याशिवाय काहीही होत नसते. आपल्या कर्तव्यातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे वृक्ष लागवड व त्याचे संगोपन करणे हे होय. त्यामुळे कर्तव्याचा एक अविभाज्य समजून वृक्ष लागवड करावी. पाळीव प्राण्यांसाठी चारा पाणी व्यवस्था करण्याबरोबर वन्य प्राण्यासाठीही किमान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहीजे, स्वच्छता ठेवली पाहीजे असे ङ्गड यांनी म्हटले. विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व अधिका-यांनी तहसिलदार बालाजी शेवाळे व त्यांच्या सर्व सहकार्याचे अभिनंदन करुन वृक्ष लागवड व त्याच्या संगोपनाचे हे कार्य असेच चालू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.