जालना । वार्ताहर
जालना शहरातील आर.पी. रोडवरील चुन्नीलाल तुलाराम भुरेवाल वेश समोरील अंडरग्राऊंड नाल्याच्या कामास सुरूवात झाली असून, लवकरच काम पुर्ण होणार आहे. नागरिकांना रस्ते, पाणी, सांडपाण्याच्या व्यवस्था करून नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती नगरसेवक श्रावण भुरेवाल यांनी दिली.
आमदार कैलाश गोरंट्याल व नगराध्यक्षा सौ. संगीता गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली आर.पी. रोडवरील नाल्याच्या कामास मंजुरी मिळाली. व तात्काळ काम सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यात गेल्या 25 वर्षापासून या रोडवर व परिसरात घाण नालीचे रस्त्यात साचून दुर्गंधी येत होती. आता नवीन अंडरग्राऊंड नालीमुळे घाण पाणी रस्त्यावर येणार नाही. या अंडर ग्राऊंड नालीचे काम कालीकुर्ती ते अमरछाया टॉकीज जालना येथपर्यंत करण्यात येणार असल्याचेही श्रावण भुरेवाल यांनी सांगितले.
Leave a comment