जालना । वार्ताहर
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम जालना जिल्ह्यात 29 जुन, 2020 च्या शासनाच्या निर्णयानुसार रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येत असुन या विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2020 अशी आहे. योजनेत सहभागी होण्याच्या तारखेमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नसल्याने जालना जिल्ह्यातील शेतकर्यांनी या योजनेत अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी केवळ एक आठवड्याचा कालावधी शिल्लक असल्याने शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र, सामान्य सेवा केंद्र, तसेच बँकांमार्फत विम्यासाठी अर्ज सादर करण्यात यावे, असेही प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
Leave a comment