परतूर । वार्ताहर
शहरात एकाच दिवशी मंगळवारी 3 कोरोना रुग्ण आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली. लाहोटी हॉस्पिटल जवळ,होलाणी गल्ली व गाव भागात कायमखानी गल्लीत प्रत्येकी एक रुग्ण निष्पन्न झालेला आहे.
परतुर शहरात आतापर्यंत 6 रुग्ण तर तालुक्यातील संख्या आता 21 वर पोहचली आहे. तर एक जणाचा मृत्यू झालेला आहे .दोन दिवसांपूर्वी कोरोना मुक्त होताहोता मंगळवारी 3 जण पॉझिटिव्ह सापडल्याने परतूर करांच्या झोपा उडाल्या आहेत .त्यातल्या त्यात हे तीनही रुग्ण सधन वर्गातील असल्याने कोरोना ने सुशिक्षित वर्गही चांगलाच हबकला आहे . इतक्या दिवस शहरात नागरिक बिनधास्त वागताना दिसत होते, हाच बिनधास्त पणा कोरोना साठी पोषक ठरत असल्याचे दिसून येत आहे. आतातरी नागरिकांनी कोरोना ला गंभीरतेने घ्यावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानदेव नवल यांनी केले आहे. शहरातील 3 ही रुग्णाच्या अतिसंपर्कातील 12 जण क्वारनटाईन केल्याची माहिती त्यांनी दिली.
Leave a comment