परतूर विधानसभा मतदारसंघातील तीनशे गावांच्या वृक्षलागवडीचा लोणीकर यांच्या हस्ते शुभारंभ
परतूर । वार्ताहर
परतूर शहरातील उड्डाण पुलाच्या कामाला गती देऊन काम त्वरेने पूर्ण करा अशा सूचना माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या ते परतुर येथील तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या कोरोना व विविध विकास कामाचा आढावा बैठकी प्रसंगी बोलत होते यावेळी विधान परिषद सदस्य राजेश राठोड, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राहुल लोणीकर, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सोपान बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती, पुढे बोलतांना आमदार लोणीकर म्हणाले की व्यापार्याचे कुठलेही नुकसान न होऊ देता रेल्वे फाटक ते महादेव मंदिर चौका पर्यंतचा रस्ता केवळ 45 फूट रुंदीचा करण्यात येणार असून यामुळे कोणाच्याही मालमत्तेला धक्का लागणार नसल्याचे ते म्हणाले रेल्वे गेट वरून होणार्या उड्डाण पुलाची लांबी 1050 मीटर असून रूंदी 25 फूट आहे त्याच बरोबर दोन्ही बाजूंनी सर्विस रोड 18 फुटांचे असल्याचे सांगतानाच काही मंडळी यासंदर्भात न्यायालयात गेलेली आहे.मात्र शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग हा 100 फुटाचा असून ही जागा शासकीय मालमत्ता आहे. मात्र व्यापार्यांचे हित लक्षात घेऊन रस्त्यात येणार्या बांधकामांना मावेजा देण्यात येणार असून मालमत्ताधारकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. सदरील उड्डाणपुलाचे काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना यावेळी उपस्थित अधिकार्यांना दिल्या.
शेतकर्यांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्या
शेतकर्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देत बँकांनी आपापल्या दिलेले टार्गेट पूर्ण करण्याच्या सूचना देताना कोरोना संकटात शेतकरी भरडला गेला असून बँकांनी उगाच कागदपत्राचा अवडंबर न माजवता शेतकर्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे सांगताना त्या कामी हायगाई केल्यास बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना होणार्या परिणामाला तयार राहा असा दम भरला मेटाकुटीस आलेल्या शेतकर्यांची अवस्था बिकट असून पेरणीचा हंगाम उलटून गेला परंतु काही बँका उगाच शेतकर्यांना कागदपत्राच्या फेर्यात गुंतवत आहेत यामुळे सदरील बँकांना हा शेवटचा निर्वाणीचा ईशारा असुन यापुढे होणार्या परिणामासाठी बँकांनी तयार रहावे. बियाणे महामंडळाचा भोंगळ धोरणामुळे हजारो एकर शेत जमिनी वरील शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले या संदर्भात परतूर विधानसभा मतदार संघात 9 गुन्हे देखील दाखल करण्यात आले असून यासंदर्भातील शेतकर्यांच्या तक्रारीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना आमदार लोणीकर यांनी यावेळी दिल्या. परतूर विधानसभा मतदारसंघातील 176 गावांची महत्त्वकांक्षी वॉटर ग्रीड योजनेचे पाणी 85 गावा पर्यंत पोहोचले असून ग्रामपंचायतींनी जोडणी करून गावातील ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा करावा यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समितीचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेण्याचे देखील त्यांनी सांगितले त्याच बरोबर येत्या महिन्याभरात आणखी 25 गावा पर्यंत पाणी पोहोचणार असून मंठा तालुक्यातील व जालना तालुक्यातील 95 गावाच्या वाटरग्रीड संदर्भात आढावा घेताना कामाला प्राधान्य देण्याचे सांगितले.आष्टी शहरातील भुमीगत गटार योजने संदर्भात संबंधीत अधिकारी यांना धारेवर धरत कामाला विलंब का होतो या संदर्भात विचारणा करतानां आ.लोणीकरांनी तात्काळ काम सुरू करण्याच्या सुचना संबंधीतांना दिल्या.
परतूर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी वृक्ष लागवड करण्यासाठी माजी मंञी आ.बबनराव लोणीकर यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले.यावेळी वृक्षांचे संगोपन जरूरी आसुन ग्रामपंचायतींनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. मागील पाच वर्षापासून वृक्ष लागवडीचा उपक्रम आपण हाती घेतला असून वृक्ष संगोपनासाठी लोकप्रतिनिधींनी त्याप्रमाणे पक्षाच्या पदाधिकार्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी लोणीकर यांनी व्यक्त केले यावेळी पंजाब बोराडे,शिवदास हनवते,ता.अध्यक्ष रमेश मंठा भाजपा तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ सभापती रंगनाथ येवले, उपसभापती रामप्रसाद थोरात उपसभापती नागेश घारे रामेश्वर तनपुरे दिगंबर मुजमुले शिवाजी पाईकराव प्रदीप ढवळे कार्यकारी अभियंता दबडे मंठा तहसीलदार श्रीमती सुमन मोरे परतूर तहसीलदार श्रीमती रूपा चित्रक गट विकास अधिकारी सुरडकर गटविकास अधिकारी बोडखे मंठा सहाय्यक निबंधक श्रीमती खरात परतुर सहाय्यक निबंधक प्रणव वाघमारे व सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
Leave a comment