मंठा । वार्ताहर
महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून दुधाचे भाव 16 ते 18 रुपये पर्यंत घसरले आहेत महाराष्ट्रातील कोरुना संकटामुळे दुधाचे संकलन होत नाही व त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होत आहे शेतकर्यांच्या उसाला योग्य दर देखील मिळत नाही अशा परिस्थितीत उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत त्यांच्या मागणीनुसार दूध उत्पादक शेतकर्यांना प्रति लिटर दहा रुपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे अन्यथा सरकारला दूध उत्पादक शेतकर्यांच्या रोषाचा सामना करावा लागेल असा इशारा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी निवेदनाद्वारे सरकारला दिला आहे.
मंठा येथील तहसील कार्यालयात तहसीलदार श्रीमती सुमन मोरे यांना यावेळी निवेदन देण्यात आले प्रसंगी तालुका अध्यक्ष सतीशराव निर्वळ माजी जिल्हा सरचिटणीस सुभाषराव राठोड उपसभापती राजेश मोरे संचालक विठ्ठलराव काळे सरपंच परिषदेचे मंठा तालुका अध्यक्ष अमोल झोल संचालक मुस्तङ्गा पठाण भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव बोराडे सरपंच राजेभाऊ खराबे शिवशंकर डोईङ्गोडे सुभाषराव बागल भगवान लहाने नितीन गुंड अरुण खराबे एकनाथ खराबे सचिन राठोड जानकीराम चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकर्यांसाठी घेतलेले निर्णय केवळ ठराविक दूध संघ पुरतेच मर्यादित असून राज्यभरातील अन्य दूध उत्पादकांवर यामुळे अन्याय होत असल्याची भावना संपूर्ण दूध उत्पादक बांधवांमध्ये आहे असेही लोणीकर यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे दूध उत्पादक शेतकर्यांना प्रति लिटर दहा रुपये अनुदानासह दूध भुकटी निर्यातीसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्यात यावे आणि गाईच्या दुधाला 30 रुपये दर देण्यात यावा अशी मागणी देखील लोणीकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे दुधाच्या पिशव्या तहसीलदारांना भेट देऊन दूध उत्पादक बांधवांसह भाजपा पदाधिकार्यांनी तहसीलदारांमार्ङ्गत आपल्या भावना शासनाकडे कळवल्या आहेत याद्वारे सकारात्मक रित्या काही निष्पन्न झाले तर ठीक नसता एक ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकर्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून भाजपा दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे याबाबत सरकार अजिबात गंभीर नसून त्याचे परिणाम सरकारला नक्कीच भोगावे लागतील असा इशारा देखील लोणीकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. राज्य सरकार दूध उत्पादक शेतकर्यांच्या बाबतीत अजिबात गंभीर नसून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांच्या काळात आंदोलन करणारे तथाकथित स्वयंघोषित शेतकरी नेते सत्तेच्या लालसेपोटी दूध उत्पादकांना वार्यावर सोडत आहेत मागील पंचवार्षिक मध्ये दुधाचा दर ते 30 रुपये असतानादेखील आंदोलन करणारे शेतकरी नेते आज 16 ते 18 रुपये भाव झाला तरी शांत आहेत परंतु भारतीय जनता पार्टी मात्र खंबीरपणे दूध उत्पादक शेतकर्यांच्या पाठीशी कालही उभी होती आणि आजही उभा आहे. सरकारने दूध उत्पादकांना अनुदान देण्याचा निर्णय तात्काळ न घेतल्यास माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर आणि युवा नेते भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार आहे सतीश निर्वळ तालुकाध्यक्ष भाजपा मंठा.
Leave a comment