आत्महत्याग्रस्त शेतकर्याची पत्नी सुमनबाई डोळसे करणार उपोषण
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील मौजे गुंज बुद्रुक येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी मनोहर डोळसे यांच्या पत्नी सुमनबाई डोळसे यांनी ता.21 मंगळवार रोजी तहसिलदार यांना दिले निवेदन गुंज बु.येथील मनोहर डोळसे यांच्या पत्नीला शासनाकडून 29 जून 2020 रोजी एक लाख रुपयाचे अर्थसाह्य मंजूर झाले आहे. 70 हजारांचा त्या महिलेच्या नांवे बाँन्ड करण्यात आला व त्यापैकी तीस हजार रु चा धनादेश तहसीलदार यांच्या हस्ते देण्यात आला तो धनादेश महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कुंभार पिंपळगाव येथे जमा करण्यात आला परंतु त्यांच्या खात्यातील रक्कम जमा झालेली नाही.
आत्यहत्याग्रस्ताच्या पत्नी सुमनबाई डोळसे या बँकेत गेल्या असता मॅनेजरने उद्या या असे म्हणत तीन -चार दिवस चकरा त्यांना मारावयास लावल्या व 16 जुलै रोजी चार वाजेपर्यंत त्यांना तिथं बसून ठेवण्यात आले चार वाजता त्या विचारायला गेले असता मॅनेजर साहेब आताच गेले असे बँकेची शिपाई यांनी सांगितले .19 जुलै रोजी मॅनेजर साहेबांना विनंती करण्यासाठी गेले असता मॅनेजर यांनी सांगीतले कि तुमच्या पतीच्या नावे बँकेचे कर्ज आहे. ते तुम्हाला भरावे लागेल . जुने कर्ज माङ्ग झाले नाही का ..या मुळे माझी पिळवणूक होत आहे. म्हणून 24 जुलै 2020 रोजी वार शुक्रवार सकाळी 11 वाजता महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कुंभार पिंपळगाव समोर माझ्या कुटुंबासह उपोषणास बसणार आहे .तसे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले असून तहसिलदार साहेबांशी याची दखल घ्यावी शासनाचे अर्थसाह्य केलेल्या या माझा धनादेश माझ्या खात्यात जमा करून माझी मला रक्म देऊन सहकार्य करावे हि विनंती निवेदना व्दारे केली आहे. तसे प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Leave a comment