बँकेवर कारवाई करण्याची मागणी
मंठा । वार्ताहर
तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका शेतकर्यांना पीक कर्ज न देता चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत असल्यामुळे सदरील बँकेवर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी ता.20 सोमवार रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तहसीलदार सुमन मोरे यांना निवेदनाद्वारे केली आहे मंठा तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवस्थापन शेतकर्यांना पीक कर्ज वाटप करण्यात टाळाटाळ करीत असून शेतकर्यांना चुकीची माहिती देऊन दिशाभुल करत आहे.
महात्मा ङ्गुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्ज माङ्गी झाल्यानंतर सुद्धा बँक व्यवस्थापन संबंधित शेतकर्यांना पिक कर्ज देत नाहीत.दुष्काळात होरपळलेल्या शेतकर्यांची अडवणूक न करता त्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे, नसता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हा उपाध्यक्ष अॅड.राजेश खरात, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब खंदारे, ता.संघटक केशव शिंदे ,शहराध्यक्ष संजय हनवते यांच्या स्वाक्षर्या आहेत.
Leave a comment