जालना । वार्ताहर
घनसावंगी विधानसभा मतदार संघा भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री व परतूर मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घनसावंगी येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने राज्यव्यापी दुध एल्गार आंदोलनाबाबत तहसीलदार देशमुख साहेब यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात 1) दुध उत्पादक शेतकर्यांना प्रती लिटर 10 रू अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे 2) दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रती किलो 50 रू अनुदान द्यावे 3) गाईच्या दुधाला 30 रू चा दर द्यावा. आज आपणास निवेदनासह दुधाच्या पिशव्या भेट देऊन आम्ही दूध उत्पादक बांधवांच्या व आमच्या भावना आपल्या मार्ङ्गत शासनाकडे कळवत आहोत.
या आंदोलनातून जर काही निष्पन्न झाले नाही किंवा याबाबत सरकार गंभीर नसेल तर 01 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभर आंदोलन उभे करण्यात येईल व त्यानंतर होणार्या परिणामास सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. यावेळी निवेदन तहसीलदार यांना निवेदन देताना भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस अंकुशराव बोबडे,भाजपा घनसावंगी विधानसभा प्रमुख रमेश महाराज वाघ,भाजपा अ.जा.प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव दादा जाधव,भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष कैलास दादा शेळके,सुरेश अण्णा उगले,अर्जुनराव माळोदे,भास्करराव पांढरे,योगेश ढोणे,अंबादास जाधव, सिध्देश्वर भाणुसे,राहुल काळे,लक्ष्मणराव पवार,विलास चव्हाण,अमोल काळे,रघुनाथ सोसे,महादेव आरगडे,गोरखनाथ चिमणकर,प्रल्हाद गाडेकर,संजय हिवाळे आदींची उपस्थिती होती.
Leave a comment