कापूस व हळद पिकात पहिल्यांदाच मुगाची केली अंतर्गत लावणी
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील सुशिक्षित बेकार तरुणांनी स्वतःहा शेती करत पारंपारिक शेती करण्याच्या पद्धतीला ङ्गाटा देऊन संकटाच्या काळात वेगळी संकल्पना राबवून परिसरात एकमेव शेतकर्यांनी अंतर्गत पिक घेऊन निदान मूळ पिकाचा खर्च पाणी निघेल या अशेने वेगळ्या पद्धतीने अंतर्गत मुगाचे पिकाचे उत्पन्न घेण्यासाठी धडपड करत आहे.कुंभार पिंपळगाव येथील सुशिक्षित बेकार शेतकरी पंडित उत्तमराव कंटुले यांनी पारंपरिक शेती करण्याच्या पद्धतीला ङ्गाटा देऊन नवीन संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणून त्यांनी यशस्वी करण्याची त्यांची किमाया आहे.
अंतर्गत पीक घेऊन शेतकरी धडपड करीत आहे त्यांनी हळद या पिकाची चार बाय चार वर दोन महिन्यापूर्वी लागवड केली हळदीच्या चार बाय चार वर सरी च्या मध्यभागी हळद लावणी केली होती त्यास ठिबकही केले आहे सरीच्या दोन्ही बाजूने त्यांनी मुगाची तीन महिन्याची पीक घेण्याचे ठरविले व त्यांनी सरीच्या दोन्ही बाजूने मुगाची लागवड केली सध्या मुगाचे पीकही जोमात आले आहे याच प्रमाणे त्यांनी दुसरा प्रयोग कापूस या पिकांमध्ये अंतर्गत मुगाची लागवड करून उत्पन्न घेण्याचाही तप्रयोग केला आहे कापूस आठ-बाय आठ वर लावणी केली त्यासही ठिबक केले व कापसाच्या मध्यभागी दोन्ही बाजूने तीन तीन ङ्गुटाचे अंतर सोडून मुगाची चिमणी पद्धतीने लागवड केली आहे सध्या कापसाच्या पिकातही मुगाचे पीक जोमदार आले आहे दोन्ही पिके मोठी बहरली दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकरी आर्थिक अडचणीत आहे यावर्षी शेतकर्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला नाही .शेतकर्यांच्या मालाला या वर्षी बाजारात कवडीमोल भाव मिळाला आहे. मी माझ्या मनाने नवीन पद्धतीने अंतर्गत पीक घेण्याचे ठरवले आहे जेणेकरून मुख्य पिकाचा खर्च पाणी तरी निघेल व आर्थिक सहकार्य होईल कापसाचे पिकात अंतर जास्त ठेवले दोन्ही बाजूने त्यामुळे आठ बाय आठ वर दोन बाय दोन दोन्ही बाजूने कापसाची लावणी केली त्यामुळे कापसाची वाढ भरपूर होईल व जास्त पाऊस झाल्या वर कापसाची बोंडे सडणार नाहीत व कापसाला मोकळी हवा राहील कापूस वेचणी सोपे जाईल अशी लागवड परिसरात एकमेव शेतकर्यांनी केली आहे ती सक्सेस करून दाखवील व त्यामुळे ते आर्थिक संकटावर मात करतील असे त्यांनी सांगितले आहे.
Leave a comment