मराठवाडास्तरीय रक्तदान शिबिरातून 9402 रक्तपिशव्याचे लोणीकर यांनी केलेले संकलन
राहुल लोणीकर यांच्या संयोजनात मराठवाड्यात विविध ठिकाणी महारक्तदान शिबिर संपन्न
जालना । वार्ताहर
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या रक्तदान शिबिराची जबाबदारी विभागनिहाय विभाग दिलेली होती मराठवाडा विभागात भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्याकडे मराठवाडा रक्तदान शिबिर संयोजकांची जबाबदारी पक्षाच्या वतीने देण्यात आले होते माजी मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री आ.सुधीर भाऊ मुनगंटीवार, माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर, युवा मोर्चा माजी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, युवा मोर्चा प्रदेश प्रभारी संजय कोडगे, विद्यमान युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यात 9402 रक्त पिशव्यांचा संकलन विविध ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले.
भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरातील मराठवाड्याचा हा आकडा महाराष्ट्रात सर्वाधिक आहे राहुल लोणीकर यांच्या वतीने नुकताच मुंबई येथे मराठवाडास्तरीय रक्तदान शिबिराचा अहवाल माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र ङ्गडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला नऊ हजार पेक्षा अधिक रक्तदान मराठवाड्यातून झाले. याबद्दल देवेंद्र ङ्गडणवीस यांनी राहुल लोणीकर यांचे भरभरून कौतुक करत मराठवाड्यातून प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने रक्तदान शिबिराचे आयोजन व त्याद्वारे युवकांनी केले रक्तदान व त्यासाठी संयोजक म्हणून राहुल लोणीकर यांनी केलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे अशा शब्दात देवेंद्र ङ्गडणवीस यांनी राहुल लोणीकर यांच्या सह मराठवाडा भाजप युवा मोर्चाचे भरभरून कौतुक केलं भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित या महारक्तदान शिबिरामध्ये जालना जिल्ह्यातून 2741 बीड 473 संभाजीनगर ग्रामीण 672 संभाजीनगर शहर 735 लातूर ग्रामीण अकराशे 70 लातूर शहर 411 हिंगोली 349 उस्मानाबाद 427 परभणी ग्रामीण 536 परभणी शहर 257 नांदेड ग्रामीण तेराशे सात नांदेड शहर 324 असे संपूर्ण मराठवाड्यात एकूण नऊ हजार 402 रक्तपिशव्या संकलन भाजप युवा मोर्चाच्या वतीने लॉकडाऊन दरम्यान करण्यात आलं मराठवाडा विभागाची रक्तदान शिबिराच्या संयोजनाची जबाबदारी राहुल लोणीकर यांच्याकडे दिल्यानंतर ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून राहुल लोणीकर यांनी मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यात बैठका घेऊन भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांना संपर्क करत त्यांना विश्वासात घेत आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आजी माजी खासदार आजी माजी आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समित्यांचे सभापती उपसभापती सदस्य युवा मोर्चाचे जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी सदस्य इत्यादींशी संपर्क करत रक्तदान शिबिर यशस्वी करून महाराष्ट्रात सर्वाधिक रक्तदान मराठवाडा विभागातून झाले पाहिजे असे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठवाड्यातील युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी या रक्तदान महायज्ञात सहभागी झाले व त्यामुळे रक्तदानाचा आकडा नऊ हजारापेक्षा अधिक होऊ शकला असे राहुल लोणीकर यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
Leave a comment