जालना-वार्ताहर
जालना शहरात गेल्या काही दिवसापासून गोर गरीब जनतेला वेठीस धरले जात आहे. हा प्रकार चुकीचा असून त्यांच्या पोटापाण्याचा कोणताही विचार न करता तसेच त्यांना संचारबंदीच्या काळात कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे कोरोनाच्या पाश्वभूमीवर जालना जिल्ह्यासाठी सरकारकडून आलेल्या निधीचा काय विनीयोग केला कोणत्या बाबीवर कीती खर्च केला याचा खुलासा जिल्हाधिकारी यांनी करावा अशी मागणी रिपब्लीकन पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष सुधाकर निकाळजे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी यांचे काम जर पारदर्शी असेल तर ते नक्कीख खुलासा करतील आणि कीती खर्च केला आणि तो कशावर केला याची माहीती जनहीतार्थ जाहीर करतील असेही सुधाकर निकाळजे यांनी म्हटले आहे.
देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला होता. त्या लॉकडाऊनच्या काळात गोर गरीबांना मोङ्गत अन्नधान्य देण्याची तरतुद करण्यात आली होती. जालना जिल्ह्यात कीती कुटुंबांना मोङ्गत अन्नधान्य देण्यात आले, कुटुंबाची संख्या, एका युनिटसाठी कीती आणि कोणते धान्य देण्यात आले ते जाहीर करावे. जिल्ह्यात कोणते धान्य कीती प्रमाणात वाटप करण्यात आले. रेशनचे धान्य हे कीती संस्थांना कोणत्या उद्ेशासाठी वाटप करण्यात आले. ज्या संस्थांना धान्य वाटप करण्यात आले त्या संस्थांची नावे आणि पत्ता असलेली यादी जाहीर करावी. शासकीय योजनेतुन आणि पैशातुन कीती लोकांना भोजन वाटप करण्यात आले. तसेच जिल्ह्यात कोण-कोणत्या संस्थांकडून मोङ्गत अन्नदान आणि किराणा वाटप करण्यात आले त्याची यादी जाहीर करावी. जिल्ह्यात कोरोनाच्या नियोजनासाठी कोणत्या बाबीवर किती खर्च झाला, ते जाहीर करावे. जिल्हा प्रशासनाने आपला व्यवहार हा पारदर्शी करावा. कोरोनाच्या काळात रुग्णांसाठी तसेच क्वारंटाईन करण्यासाठी नियोजीत सेंटरमधे कोण कोणत्या सुविधा दिल्या जातात त्या सुविधांची यादी जाहीर करावी त्यामुळे कोरंटाईन करण्यात आलेल्यांना आपल्या हक्काची माहीती होईल. कोविड रुग्णालय आणि क्वारंटाईन सेंटरमधे सुविधा पुरवण्यासाठी कोणत्या संस्था, आस्थापणांना काम देण्यात आले त्याचे नाव आणि पत्ते जाहीर करण्यात यावेत. अनेक क्वारंटाईन सेंटरमधे मुलभुत सुविधा दिल्या जात नाहीत, तसेच व्यवस्थीत जेवनही दिले जात नाही. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन सुविधा न पुरवणार्या आस्थापना, संस्थांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यार गुन्हे दाखल करण्यात यावेत. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणती औषधे आणि कोणती उपकरणे कीती प्रमाणात आहेत. त्याची यादी जाहीर करण्यात यावी. जिल्ह्यात कीती खाजगी रुग्णालयाचा कीती टक्के ताबा घेण्यात आला आहे त्याची यादी जाहीर करण्यात यावी. जालना जिल्ह्यात एमआयडीसी सुरु ठेवल्याने कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे ही एम आयडीसी बंद का केली नाही. सर्व बंद असतांना पेशंट कसे वाढले याचा खुलासा करावा. तसेच एमआयडीसी तात्काळ बंद करण्यात यावी. जिल्ह्या एकूण कीती व्हेंटीलिटर आहेत आणि कीती व्हेंटीलीटरचे वापर करण्यात आला, रुग्णांकडे दुर्लच् केले जात आहे. त्यांना योग्य उपचार दिले जात नाहीत, त्यामुळे मृत्युदार वाढत आहे. असे समजले आहे त्यामुळे रुग्णांचा मृत्यु दर का वाढला आहे याचा खुलासा जिल्हाधिकारी यांनी करावा. जिल्ह्यात आणि शहरात कीती कंन्टेन्मेंट झोन करुन त्या ठीकाणी पत्रे ठोकणे आणि घर, गल्ली, परीसर सिल करण्यासाठी कीती रुपये खर्च आला आहे. एक सिल करण्यामागे कीती रुपये देण्यात येतात ते जनहीतार्थ जाहीर करावे. अशा विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री यांना पाठवले आहे.
Leave a comment