तीर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील पशुपतीनाथ महादेव मंदिरीच्या जागेवर तार कुंपनवालचे उद्घाटन श्रीकृष्ण पुरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. येथील रामसगाव रस्त्यावरील पद्मामाई गॅस एजन्सी समोरील असणारे पशुपतिनाथ महादेव मंदिर हे थोड्याच कालावधीमध्ये प्रसिद्ध झाले.असुन परिसरातील भाविक भक्त या मंदिरात श्रावण महिन्या निमित्त भंडारा पूजा-अर्चेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये येथे येत असतात या मंदिराला संरक्षण कुंपन व्हावे म्हणून मंदिर समितीकडून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंन्द्र पवार यांच्याकडे मागणी केली होती. ही मागणी पूर्ण करत यांनी ता. 19 रोजी पशुपतीनाथ महादेव मंदिराच्या संरक्षण कुंपनवालचे उद्घाटन श्रीकृष्ण पुरी महाराज उकडगावकर यांच्या हस्ते केले. या उद्घाटन प्रसंगी बोलताना जि.प उपाध्यक्ष महेंद्र पवार म्हणाले की माझ्याकडे मंदिर समितीकडून वेळोवेळी संरक्षण कुंपन बांधण्यात यावे अशी मागणी केली होती. व मी दिलेले अश्वासन पाळले असून संरक्षण कुंपनाचे काम सुरु केले आहे व लवकरच मंदिराला शोभेल असा सभामंडप देखील देण्याचा आपला मानस असून लवकरच या मंदिरासाठी भव्यदिव्य सभामंडप उभारण्याचे ठाम आश्वासन मंदिर समितीला जि.प. उपअध्यक्ष महेंन्द्र पवार यांनी संरक्षन कुंपन वालच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगीतले. तसेच श्रीकृष्ण पुरी महाराज यांनी देखील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भगवंतावर श्रद्धा असावी त्याचप्रमाणे स्वच्छता बाळगावी व गरज असेल तर घराच्या बाहेर पडावे व घालून दिलेले नियम पाळल्यास कोरोना पासून बचाव होऊ शकतो. व लवकरच ही कोरोना महामारी भारतातून नष्ट होईल अशी भगवंताकडे मनो-मनी प्रार्थना करू असे श्रीकृष्णपुरी महाराज आपल्या भाषणाच्या शेवटी म्हणाले यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्जेराव गिरे व प्रतिष्ठित शेतकरी विजय नाना पवार होते. यावेळी विठ्ठल बोबडे गोपाल वायकर परमेश्वर गाढे किशोर खंडागळे रुस्तुम ताटे बाळू भुतेकर संतोष चिमने चिंन्मय जोशी अनिल खंडागळे राजु चिमणे दिलीप मोरे शरद बोबडे आदींची उपस्थीती होती.
Leave a comment