जालना । वार्ताहर
दिवसेंदिवस कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असून संपूर्ण देश या विषाणूमुळे आरोग्याच्या चिंतेत आहे. अशातच बँकेच्या कर्मचार्यांमध्ये भितीचे वातावरण असले तरी ग्राहकांना सेवा देत आहेत. बँकेत रोखपाल, लिपीक, अधिकारी हे शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करुन ग्राहकांना सेवा देत आहेत. बँकेच्या कर्मचार्यांना त्यांच्या आरोग्याची तर काळजी घ्यायचीच आहे व आपल्यामुळे आपल्या परिवार व ग्राहकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याचीही काळजी घ्यायची आहे.
अशा परिस्थितही बँकेचे कर्मचारी बँकेत येणार्या ग्राहकांना सेवा देत आहेत. सदर आजारामुळे त्यांना आर्थिक तोटा होऊ नये म्हणून बँकेच्या संचालक मंडळाच्या निर्णयानुसार कर्मचार्यांना, बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी व प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने कॅशलेश आरोग्य विमा दिला असून चार लाखापर्यंतचा कॅशलेश विमा कर्मचार्यांना दिला आहे. त्यामुळे सर्व कर्मचार्यांमधून आनंद व्यक्त करुन बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार श्री. विलासबापू खरात, चेअरमन नितीन तोतला, व्हा. चेअरमन बळीराम जिगे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन वाणी यांचे आभार मानले आहेत.
Leave a comment