बदनापूर । वार्ताहर

बदनापूर येथील शुक्रवारी भरलेल्या आठवडी बाजारात सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडालेला दिसत असतानाच कित्येत नागरिकांनी तर मास्कही लावलेल्या नसल्यामुळे कोरोना विरुध्दची लढाई कशी जिंकणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. बिगर रेड झोन असलेल्या झोनमध्ये लॉकडाऊन नंतर परिस्थिती पूर्वपदावर येण्याच्या उददेशाने सरकारने दिलेल्या मार्ग्दर्शक सूचनानुसार जिल्हयातील दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत उघडी ठेवण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी यांनी 21 मे रोजी दिलेल्या आहेत. 

दरम्यान या सूचना देतानाच कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून विविध उपाययोजना व मार्गदर्शन ही करण्यात आले असून दुकानासमोर गर्दी न होऊ देणे, मास्क वापरणे, वारंवार सेनिटायझरचा वापर करणे आदींची काटेकोर अंमलजबजावणी करण्याचे सांगण्यात आलेले असून स्थानिक प्रशासनाने गर्दी होणार्‍या दुकानांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. असे असतानाही शुक्रवारी बदनापूर येथील आठवडी बाजारात या सूचनांचे पालन न होता मोठया प्रमाणात गर्दी दिसून आली. दुकाने सुरक्षित अंतरावर लावण्याचे नियोजन कोलमडून पडलेले होते. तर दुकाने उघडणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दीचे प्रमाणही वाढलेले दिसून आले असतानाच नगर पंचायतने खबरदारी न घेतल्यामुळे सोशल डिस्टन्सींगचा फज्जा येथे उडालेला दिसून येत होता. दुकानांवर ग्राहकांची उडी दिसून येत असतानाच एकाच दुकानासमोर 5 पेक्षा अधिक ग्राहक गोलाकार बसलेले बघायला मिळत असतानाच काही जण तर या गर्दीतही मास्क परिधान न केलेले दिसून येत होते. आठवडी बाजारात झालेल्या या गर्दीसदृश गोष्टीवर नगर पंचायत अधिकारी - कर्मचारी यांनी वचक ठेवून सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यासाठी कठोर कारवाईची गरज असताना  नगर पंचायत बदनापूरचे अधिकारी कर्मचारी मात्र या ठिकाणी क्वच्तिच फिरताना दिसले. एक रिक्षा दररोजसारख्या ध्वनिक्षेपकांवरून सूचना करत फिरत असला तरी अशी गर्दी होऊ नये म्हणून नगर पंचायतने फिरत्या पथकामार्फत कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झालेली असताना त्या कडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने बदनापूर शहरात कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.