परतूर । वार्ताहर
शहरातील तहसील मागील बाजूस असलेली जगन्नाथ नगर मध्ये नाल्या व गटार तुंबल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांनाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.या भागात नागरिक सुविधेच्या समस्या वाढल्या आहेत. सोडवण्याची मागणी होत आहे. जगन्नाथ नगर मधील नाल्या अनेक दिवसापासून साफसफाई केली नसल्याने नाल्या तुंबल्या आहेत. तसेच नाल्याचे पाणी येथील अंभुरे यांच्या शेजारी असलेल्या एका रिकाम्या प्लॉटवर साचात असल्याने येथे मोठे गटाराचे स्वरूप झाले आहे. या गटारामुळे या भागात सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या पावसाळा असल्याने पावसाचे पाणी साचात असल्याने नागरिकांना पाण्यात वाट काढावी लागत आहे. नागरिकांना पालिकेचे पाणी नियमित वेळेवर सुटत नसल्याच्या तक्रारी आहेत. नगरसेवक व पालिकेच्या कर्मचारी यांना वेळोवेळी सांगून ही लक्ष देत नसल्याचे बोलले जाते. येथील नागरिकांच्या पाणी, स्वच्छता, नाल्या रस्ते यासह अनेक तक्रार आहेत मात्र नगरसेवक लोकप्रतिंनिधी लक्ष देत नसल्याचा आरोप येथील रहिवाशी करत आहेत.
सध्या कोरोंनाच्या संकट असताना नागरिकांना अस्वच्छता असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे आजाराला निमंत्रण मिळेल. या भागातील नगरसेवकांना व पालिकेच्या कर्मचारी यांना वेळोवेळी सांगून ही लक्ष देत नाहीत. पाणी वेळेवर सुटत नाही. नाल्या नियमित काढल्या जात नाही. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याकडे पालिकेने लक्ष घालून समस्या सोडवण्याची मागणी येथील रहिवाशी संतोष आखाडे यांनी केली आहे.
Leave a comment