कुंभार पिंपळगाव स्मशानभुमीमध्ये वृक्ष लागवड
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
आपण जे काम करत आहोत ते सर्व समावेशक असून प्रत्याकाच्या निरोगी आरोग्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवृधन करणे काळाची गरज असून भविष्यात वृक्ष लागवड महत्वाची ठरेल. घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील स्मशानभुमी मध्ये ता.18 शनिवार रोजी विविध वृक्षांची लागवड समाजभान टिमच्या वतीने करण्यात आली. ऑपरेशन ग्रीनच्या पर्यावरण रक्षण मोहिमेचा चौथा टप्प्यातील वृक्ष लागवड घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील स्माशान भुमी येथे 21 झाडे लाऊन करण्यात आली. समाजभान व नारायण भाऊ देवकाते यांनी दिलेल्या एकुन 100 झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले असून. ऑपरेशन ग्रीनअंतर्गत यावर्षी गावा-गावांमध्ये वृक्ष लागवडीचे नियोजन तहसिलदार यांच्या मार्ग दर्शनाखली समाजभान प्रत्येक गावात वृक्ष मित्रांच्या साहाय्याने झाडे लाऊन ति जगवण्याची जिम्मेदारी देत आहे.
कुंभार पिंपळगाव स्मशान भुमी मध्ये वृक्ष लागवडीसाठी समाजभान च्या वतीने झाडे देऊन पत्रकार अशोक कंटुले यांनी तहसिलदार यांनी दिलेली जिम्मेदारी म्हणून स्वखर्चाने खड्याचे नियोजन करून वृक्ष लागवड करण्यात आली . लिंब ,करंज , वड, चिंच ,अंबा , कडू निंब ,पिंपळ, विविध प्रकारची फुले,फळे, सावली देणारी झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात अला.ऑपरेशन ग्रीनअंतर्गत यावर्षी गावा-गावांमध्ये झाडे लावण्यात येणार आहेत. लावलेलं प्रत्येक झाडं जगलं पाहिले हाच मुख्य धागा पकडून ही मोहीम राबवून प्रत्येक गाव हिरवेगार करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. समाजभान प्रत्येक गावात वृक्ष मित्रांच्या साह्याने झाडे लावून ती जगवणार आहे. या मोहिमेला घनसावंगी तालुक्यातील पहिल्या टप्प्यात दहा गावामध्ये वृक्षलागवड करण्याचे नियोजन तहसिलदार यांच्या बैठकित करण्यात आले होते. घनसावंगी तालुक्याचे जलदुत नारायणभाऊ देवकाते, महादेव मते यांच मोलाचं मार्गदर्शन मिळत आहे. दादासाहेब थेटे, अरून राऊत सर, शंकर बोबडे सर, आकाश चाफाकानडे, किशोर राऊत, आसाराम राऊत, अप्पासाहेब गोरे, ओम टेकाळे, पत्रकार गणेश ओझा, पत्रकार अशोक कंटुले,यांची या वेळी उपस्थिती होती. प्रत्यकाने एक झाड लावूया... प्रत्येक झाडं जगवूया..!
Leave a comment