नागरीकांनी घाबरण्याऐवजी नियम पाळावावेत-अंकुश पाचफुले
जालना । वार्ताहर
जालना तालुक्यातील नाव्हा येथे कोरोना या संसर्गजन्य आजाराचा एक रुग्ण आढळून आल्यानंतर ग्रामपंचायतच्यावतीने संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, गावकर्यांनी या आजाराची भिती बाळगण्याऐवजी नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपसरपंच अंकुश पाचफुले यांनी केले आहे.
नाव्हा येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर खबरदारीची उपाय योजना म्हणून गावात तीन दिवस संपूर्णत: बंद पाळून आरोग्य विभागामार्फत अंगणवाडी सेविका, आशा सेविकेमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरु करण्यात आले असून ग्रामपंचायतमार्फत गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली यावेळी मानेगाव आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. जाधव, आरोग्य विस्तार अधिकारी जे. एल. भुतेकर, श्री साळवे, श्री मेहते, सरपंच सौ. संध्या अनिल सरकटे, उपसरपंच श्री अंकुश पाचफुले, ग्रामसेवक जी. व्ही. सातपुते, अनिल सरकटे, माजी सरपंच विष्णु भुतेकर, नानाभाऊ सुरुशे, दशरथ राठोड, संभाजी भुतेकर, संजय जाधव, किशोर मगर, रामेश्वर भुतेकर, शिवाजी भुतेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी उपसरपंच अंकुश पाचफुले यांनी गावकर्यांना घाबरुन न जाता शासकीय नियमांचे पालन केले तर या आजारावर आपण सहजपणे मात करु शकतो. त्यामुळे गावकर्यांनी घाबरुन न जाता वेळोवेळी साबणाने हात धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, बाहेर जातांना मास्कचा वापर करावा, सुरक्षित राखावे, आदी सूचनाही श्री. पाचफुले यांनी यावेळी केल्या.
Leave a comment