खरीपातील पिके पाण्याखाली; दोन तास धुवाधार
जळगाव सपकाळ । वार्ताहर
भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ व सुरंगळी परिसरात गुरुवारी सकाळी आठ वाजेपासुन दहा वाजेपर्यत तब्बल दोन तास जोरदार पाऊस बरसला त्यामुळे शेतशिवारातील खरीप पिकांमध्ये पाणीच पाणी तुंबले होते तर नदी नाल्याना मोठा पुर आला होता.
गुरुवारी सकाळी झालेल्या जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जळगाव सपकाळ,सुरंगळी,करजगांव,कल्याणी,मुर्तड,कोठा कोळी,आडगांव,दहिगांव या गावातील शेतकर्याची खरीप हंगामातील कपाशी,मका,सोयाबीन पिकांमध्ये नाल्याचे पाणी घुसल्याने अनेकांची पिके पाण्याखाली गेल्याने शेताला तळयाचे स्वरुप पहायला मिळाल्याने पिकाची नासाडी होणार असल्याने पिके हातची जाणार असल्याचे शेतकर्यांनी बोलुन दाखविले यामध्ये सुरंगळी येथील अविनाश जाधव,अल्काबाई जाधव,मोतीराम दांडगे,तुकाराम जाधव,दत्तु टोन्पे,काशिनाथ जाधव,मोतीराम जाधव,यांची पिके झालेल्या पावसाने काही वाहुन गेली तर काही शेतकर्यांची शेतात पाणी तुंबल्याने खराब होणार असल्याने केलेला खर्च तर वाया गेलाच पण आता शेतातील पाणी ओसरल्यानंतर दुबार पेरणी करावी लागणार असल्याने खर्च करावा तरी कुठुन या विवंचनेत आहे. तसेच अनेक शेतकर्यांच्या शेतातील जनावरांच्या गोठयात पाणी शिरल्याने जनावरासांठी साठवुन ठेवलेला चारा खराब झाला आहे त्यामुळे शेतकर्यावरील संकटे हे कधी दुष्काळ तर कधी अतीवृष्टीमुळे शेतकरी हताश आहे झालेल्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहे.
Leave a comment