कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवनगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांना सध्याच्या कोरोना संसर्ग आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती मुळे प्रत्यक्ष शाळा बंद असल्याने घनसावंगी पंचायत समिती सभापती भागवतराव रक्ताटे, उपसभापती बन्सीधर शेळके व गटशिक्षणाधिकारी रविद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन शिक्षण चालू आहे.
यासाठी शाळेतील शिक्षकांनी आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे पालक यांच्याशी संपर्क साधून व्हॉटस्अॅप नंबर जमा करून प्रत्येक वर्गाचा ग्रुप बनवून त्यावर रोज संध्याकाळी दुसर्या दिवसाचा अभ्यास टाकून पालकांना फोन लावुन सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करतात येथील शाळेत आज पहील्या वर्गात 18 विद्यार्थी आहेत त्यापैकी 13 विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करतात वर्ग दुसरा पट संख्या 18 आहे त्या पैकी ऑनलाइन अभ्यास करणारे 14 विद्यार्थी आहेत. वर्ग तिसरा पट संख्या 30 ऑनलाइन अभ्यास करणारे विद्यार्थी 23 वर्ग चौथा पट संख्या 20 ऑनलाइन अभ्यास करणारे विद्यार्थी 16 आहेत.
वर्ग पाचवा पट संख्या 28 ऑनलाइन अभ्यास करणारे विद्यार्थी 21 वर्ग आहेत वर्ग सहावा पट संख्या 13 ऑनलाइन अभ्यास करणारे विद्यार्थी 9 वर्ग सातवा पट संख्या 20 ऑनलाइन अभ्यास करणारे विद्यार्थी 17 वर्ग आठवा पट संख्या 16 ऑनलाइन अभ्यास करणारे विद्यार्थी 13 अशाप्रकारे चांगल्या प्रकारे सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण तौर यांनी दिली. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांची मदत होत आहे. या उपक्रमांसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण तौर, सहशिक्षक युवराज डावकर, ज्ञानेश्वर एडवळे, दिनेश चोपडे, पांडुरंग राउत आदी विशेष प्रयत्न करत आहेत.
Leave a comment