कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तसलुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील शरदचंद्रजी पवार उच्च माध्यमिक विद्यालय एचएससी बोर्ड परीक्षेत 98.26% गुण प्राप्त करून विध्याल्यानी यशाची परंपरा कायम राखली असून विज्ञान शाखेचा निकाल 98.73% व कला शाखेचा निकाल 97.87 लागला आहे. दोन्ही शाखेतून एकूण 174 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 170 विद्यार्थी उतीर्ण झाले यामध्ये विशेष प्राविण्यासह 15, प्रथम श्रेणीत 98 द्वितीय श्रेणीत 55 तर तृतीय श्रेणीत 2 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.
कला शाखेतून कु. गीता बालाजी शिंदे प्रथम (87.07) तर द्वितीय कु. ऋतुजा शिवाजी आर्दड (84.46) तर तृतीय भरत रामेश्वर काळे (83.84) तसेच विज्ञान शाखेतून प्रथम क्र. अभिषेक लक्ष्मण सोळंके (81.84) , द्वितीय कु. माधुरी दत्तात्रय कंटुले (74.76) तर तृतीय विजय नारायण नाईकनवरे (74.61) सर्व उतीर्ण व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रवींद्रजी तौर, सचिव सौ. किरणताई तौर उपाध्यक्ष धिरजसिंह तौर, संचालक डॉ. सूरजसिंह तौर प्रशासकीय अधिकारी श् विनोद कराडे, प्रा. ज्ञानदेव सोळंके, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्या दिल्या.
Leave a comment