जालना । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नागरीकांची काळजी घेण्यासाठी तसेच कुणीही या आजाराला घाबरून न जाता स्वतः पुढे येऊन आरोग्य तपासणी करावी यासाठी प्रभाग क्र 29 मध्ये पांगारकर नगर जालना येथे दि. 15 जुलै रोजी दुपारी 12 वाजुपासून कोरोना चाचणीचा विषेश कॅम्प आयोजीत केला होता. या कॅम्प मधे सुमारे 50 जनांच्या लाळेेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
यावेळी किशोर पांगारकर, गजानन पांगारकर, सुनिल वाकडे, डॉ. दिपक खिल्लारे, कुणाल निर्मळ, सत्यम बनसोडे, सुपरवायझर ळलवी श्रीमती घुग, अंगणवाडी सेविका कांबळे, गावंडे, कर्डिले, मोगरे, गेडाम, कुलकर्णी यांची उपस्थिती होती. नगरसेवक अशोक गणपतराव पांगारकर यांच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वतःची तपासणी करुन घेतली. तर प्रभाग क्र. 29 या भागात नियमीत सर्वे सुरु असून आतापर्यंत सुमारे 3500 जनांचा सर्वे करण्यात आला आहे. तसेच या प्रभागातील कुटुंंबीयांच्या काळजीसाठी आणि अत्यावश्यक सेवेसाठी विषेश टीम सुध्दा सक्रीय ठेवण्यात आली आहे.
Leave a comment