कॉलनीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र : आरोग्य सर्वेक्षण होणार
मंठा । वार्ताहर
मंठा तालुका एक महिन्यापासुन कोरोना मुक्त झाला होता.कोरोनामुक्त झालेल्या मंठ्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असुन शहरातील एका महिलेचा कोरोना अहवाल ता.12 रविवार रोजी पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. त्यामुळे तालुका प्रशासन सतर्क झाले असुन सुरक्षिततेच्या दृष्टीने कॉलनीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आला आहे.
तालुक्यातील कोरोनाची पहिली साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत नागरिकांनी चांगली साथ दिलेली होती.त्याचबरोबर आरोग्य विभागाचे मोलाचे योगदान दिले.त्यात तालुक्यातील 21 कोरोना बाधित व्यक्तींनी कोरोनावर मात केली होती. मागील एक महिन्यापासून तालुक्यात कोरोना रुग्ण आढळुन आला नाही. मात्र , महिन्यानंतर मंठा शहरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आरोग्य विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार शहरातील गोरे कॉलनीतील एका महिलेला आजारापोटी दहा दिवसापुर्वी जालना येथील खाजगी रूग्नालयात दाखल केले होते.सदर महिलेला ता.9 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती तहसिलदार सुमन मोरे यांनी दिली.सदरील महिलेच्या संपर्कातील व्यक्तींना शहरातील कोव्हिड केयर सेंटर येथे ठेवण्यात आले असुन त्याची तपासणी करून घेण्यात येणार आहे.तसेच कॉलनीचा परिसरात आरोग्य विभागाकडून आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे.तसेच सुरिक्षततेच्या दृष्टीने कॉलनीचा परिसर उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी प्रतिबंधित म्हणुन घोषित करण्यात आला असुन कलम 144 लागु करण्यात आले असल्याचे नगर पंचायतकडुन सांगण्यात आले.सदरील कॉलनी परिसराची पोलीस निरिक्षक विलास निकम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिपक लोणे, नगर पंचायत मुख्याधिकारी सतिश कुलकर्णी, वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रताप चाटसे, डॉ.चव्हाण, आरोग्य सहाय्यक दत्ता सरकटे, सुजीत वाघमारे यांनी पाहणी केली.
संशियताचा अहवाल बाकी
शहरातील सुगंधा नगर येथील पुणे येथुन आलेल्या एका 21 वर्षीय तरूणाला कोरोना संशयित लक्षणे दिसून आल्याने पुढील तपासणीसाठी जालना येथे पाठविण्यात आले आहे व त्याचा अहवाल ही लवकरच प्राप्त होईल अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिपक लोणे यांनी केले.
Leave a comment