टाकळी कोलतेचे पीक विमा ऑनलाईन पोर्टलमध्ये नाव समाविष्ट

जालना । वार्ताहर

बदनापूर विधानसभा मतदार संघातील टाकळी कोलते या गावाचे नाव ऑनलाईन पोर्टलवर दिसत नसल्यामुळे शेतकर्‍यांना पीक विमा भरण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. टाकळी कोलते येथील शेतकरी व भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाबासाहेब कोलते, सरंपच विजय आहेर, सभापती सविताताई फुके यांनी केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे व  आ. नारायण कुचे यांच्याकडे निवेदन देऊन टाकळी कोलते गाव पीक विमा भरण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर घेण्यात यावे यासाठी विंनती केली. त्यानुसार निवदेनाची दखल घेवून ना. दानवे व आ. कुचे यांनी कृषि मंत्रालयाकडे व कृषि आयुक्त पुणे यांच्याकडे तात्काळ पाठपुरावा करून सदर टाकळी कोलते येथील शेतकर्‍यांची पीक विमा भरण्यासाठी पोर्टलवर घेण्याच्या सुचना केल्या.

या पार्श्‍वभुमीवर शनिवार ता. 12 जुलै रोजी टाकळी कोलते या गावाचे नाव ऑनलाईन पोर्टलवर सामाविष्ट करण्यात आले व शनिवार पासून शेतकर्‍यांनी पीक विमा भरण्यास सुरूवात केली आहे. तीन महिण्यापासून कोरोनामुळे सर्व उद्योगधंदे बंद असल्याने शेतकर्‍यांची मोठी अडचण झाली असून कपाशी, मका हे पीके घरातच पडून आहे. पीक विमा भरून पीकांचे संरक्षण करण्याचा शेतकर्‍यांचा प्रयत्न आहे. नैसर्गीक आपत्तीने नुकसान झाल्यास पीक विम्याचे संरक्षण कवच असते. टाकळी कोलते या गावचे पंतप्रधान पीक विमा योजनेच्या पोर्टलवर यापुर्वी नाव येत नसल्यामुळे शेतकर्‍यांना अडचण निर्माण झाली होती. या भागात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात शेततळे केलेली असून फळबाग लागवड केलेली आहे. हक्काचा पीक विमा भरण्यासाठी शेतकरी सीएसी सेवा केंद्र ऑनलाईन प्रणाली असलेल्या अस्थापनेवर चकरा मारत होते. मात्र या पीक विम्याच्या ऑनलाईन पोर्टलवर टाकळी कोलते गावाचे नाव येत नसल्याने हे गाव पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता होती. परंतू ना. दानवे व आ. कुचे यांनी दखल घेतल्यामुळे व वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे शेतकर्‍यांना पीक विमा भरता येणार असल्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.